सिध्दार्थ दिवेकर (जिल्हा प्रतिनिधी यवतमाळ) मो.9823995466
उमरखेड (दि. 12 ऑक्टोंबर) तालुक्यातील झाडगाव येथील महिलांनी फाट्यावरील अवैधरित्या चालू असलेली दारू विक्री, गांजा विक्री आणि मांस विक्री त्वरित बंद करण्यात यावी.
या दारूविक्री मुळे आम्हा महिलांना नाहक त्रास होत आहे. यामुळे नवीन नवयुवक सुध्दा व्यसनाधीन होत आहे. त्यामुळे आपण अवैध धंदे त्वरित बंद करण्यात यावे.
अन्यथा आम्ही आमरण उपोषणाला बसू अशा आशयाचे निवेदन दि 12 10/ 2023 रोजी पोलीस स्टेशन पोफाळी येथे देण्यात आले. यावेळी झाडगाव येथील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.




