Home चंद्रपूर एक आक्टोंबरला, एक तास गावाच्या स्वच्छतेसाठी-ग्रामस्थांच्या सहभागातून प्रत्येक गावात महाश्रमदान

एक आक्टोंबरला, एक तास गावाच्या स्वच्छतेसाठी-ग्रामस्थांच्या सहभागातून प्रत्येक गावात महाश्रमदान

281

 

 

चंद्रपूर (प्रतीनिधी) राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीचे औचित्य साधून 02 ऑक्टोबर हा दिवस “स्वच्छ भारत दिवस” म्हणून साजरा केला जातो. यावर्षी “स्वच्छ भारत दिवस 2023” च्या निमित्ताने 15 सप्टेंबर ते 02 ऑक्टोबर या कालावधीत “स्वच्छता ही सेवा” हा उपक्रम स्वच्छ भारत मिशन ग्रामीण व शहरी यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येणार असून, दिनांक 01ऑक्टोबर 2023 रोजी देशभरात प्रत्येक गावात,शहरात व्यापक स्वरूपात “एक तारीख- एक तास” स्वच्छतेसाठी श्रमदानातून स्वच्छता मोहीम राबविण्यात येणार आहे.
“स्वच्छता ही सेवा 2023” ची थीम “कचरामुक्त भारत”आहे. यामध्ये “दृष्यमान स्वच्छता” व “सफाईमित्र कल्याण” यावरती लक्ष केंद्रित केले असून, ग्रामीण भागातील बसस्थानक,पर्यटन स्थळे,वारसा स्थळे,नदी किनारे,घाट, नाले आदी सार्वजनिक ठिकाणी शहरी व ग्रामीण भागात ही संयुक्त मोहीम असेल,याबाबत सविस्तर निर्देश सर्व पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी यांना देण्यात आले आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व गावात गावकऱ्यांच्या सहभागातून श्रमदान करावयाची ठिकाणे प्रत्येक गावात निश्चित करण्यात आली असुन, प्रत्येक गावात एक ऑक्टोबर रोजीची महाश्रमदान मोहीम यशस्वी करण्यासाठी ग्रामस्थांनी एक दिवसातील एक तास आपल्या गावाच्या स्वच्छतेसाठी द्यावे व आपल्या गावात राबविण्यात येणाऱ्या महाश्रमदान मोहीमेत मोठ्या संख्येने सहभागी होवून आपले गाव,गावाचा प्रत्येक परिसर स्वच्छ करण्याचे आवाहन चंद्रपूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉनसन यांनी केले आहे.*

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here