चिमूर –
राष्ट्रीय ओबीसी महासंघ चंद्रपूर जिल्हा यांनी ओबीसीच्या न्याय हक्क व संविधानिक मागण्यासाठी व रविंद्र टोगे यांनी केलेल्या अन्नत्याग आंदोलनाच्या समर्थनार्थ चंद्रपूर जिल्हा बंदचे आयोजन करण्यात आले. त्या अंतर्गत दिनांक 30 सप्टेंबर रोजी चिमूर तालुका बंदचे आयोजन करण्यात आले आहे.
चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालयसमोर राष्ट्रीय ओबीसी विद्यार्थी महासंघाचे जिल्हाध्यक्ष रविंद्र टोंगे यांनी दिनांक 11 सप्टेंबर पासून व विजय बल्की, प्रेमानंद जोगी यांनी दिनांक 22 सप्टेंबर पासून अन्नत्याग आंदोलन करत असून सरकार कडून अजून पर्यंत मागण्या पूर्ण करण्याचे कोणतेही आश्वासन न मिळाल्यामुळे दिनांक 30 सप्टेंबर 2023 रोजी राष्ट्रीय ओबीसी महासंघाने चंद्रपूर जिल्हा बंदची हाक दिली आहे, त्या समर्थनार्थ चिमूर तालुका बंदची घोषणा करण्यात आली असून या आंदोलनाला भारतीय जनता पार्टी, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसने जाहीर पाठिंबा दिला आहे. सर्व व्यापाऱ्यांनी 30 सप्टेंबरला बंद ठेऊन सहकार्य करण्याचे आवाहन राष्ट्रीय ओबीसी महासंघ व सर्व पक्षाचे वतीने करण्यात आले आहे.




