दौंड – महालक्ष्मी मारुती उद्योग समूहाच्या वतीने पंचायत समिती दौंडचे गटविकास अधिकारी अजिंक्य येळे यांच्या हस्ते दौंड तालुक्यातील केंद्रप्रमुख, विषयतज्ज्ञ व शिक्षक,५० जणांना आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
दौंड ता.१६ सप्टेंबर २०२३.महालक्ष्मी ऑटो मोटिव्ही प्रायव्हेट लिमिटेड मारुती सुझुकीचे डिलर. (मालक) मा.नितीन सदाशिव सातव.यांच्या वतीने दौंड तालुक्यातील जि.प. शाळेतील शिक्षकांसाठी पुरस्कार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. दि,१६ सप्टेंबर २०२३ रोजी मौजे पाटस ता दौंड जिल्हा पुणे येथील पंचरत्न मंगल कार्यालय येथे पार पडला. महालक्ष्मी उद्योग समूहाचे व मारुती सुझुकी डिलर – मा,नितीन सातव यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे दौंड पंचायत समितीचे गटविकास अधिकारी मा अजिंक्य येळे, तसेच भिमा पाटस साखर कारखान्याचे संचालक विकास शेलार प्रामुख्याने उपस्थित होते.
महालक्ष्मी मारुती उद्योग समूहाचे चीफ जनरल मॅनेजर मा.संदिप पवार व दौंड पंचायत समितीचे गट विकास अधिकारी मा.अजिंक्य येळे यांच्या हस्ते.आदर्श शिक्षक पुरस्कार देण्यात आला. दौंड तालुक्यातील निवड केलेल्या शिक्षकांना पुरस्काराने गौरविण्यात आले. तसेच सन्मान चिन्ह व प्रमाणपत्र मान्यवरांच्या हस्ते देऊन सत्कार करण्यात आला.
दौंड तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शिक्षक शिक्षिका तसेच सामाजिक शैक्षणिक व सांस्कृतिक क्षेत्रातील पदाधिकारी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या वेळी प्रमुख मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे आयोजन केल्याबद्दल मारुती सुझुकी चे डिलर मा. नितीन सदाशिव सातव साहेब व त्यांच्या कुटुंबीयांचे मनापासून आभार व्यक्त करतो अशी प्रतिक्रिया गट विकास अधिकारी मा अजिंक्य येळे यांनी व्यक्त केली.महालक्ष्मी मारुती उद्योग समूहाचे चीफ जनरल मॅनेजर मा.संदिप पवार यांनी बोलताना सांगितले. तसेच राज्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळांची शैक्षणिक परिस्थिती पाहता पूर्वीपेक्षा निश्चितच बदल झाला असुन सध्या प्रगतीपथावर दिसुन येत असल्याने शिक्षकांचा सन्मान करवा व त्यांना प्रोत्साहन द्यावे. व सामाजिक बांधिलकी जपावी. आदर्श शिक्षक पुरस्कार या कार्यक्रमाच्या निमित्ताने दौंड तालुक्यातील सामाजिक शैक्षणिक व सांस्कृतिक क्षेत्रातील मांन्यावरांनी प्रामुख्याने उपस्थिती दर्शविली होती. या प्रसंगी दौंड पंचायत समिती मधील केंद्र प्रमुख – श्री. चंद्रकांत केळकर, श्री. प्रणयकुमार पवार व विषयतज्ज्ञ श्री.दत्तात्रय कुदळे व इतर शिक्षकांना सन्मानपत्र व सन्माचिन्ह देवून गौरविण्यात आले.
या कार्यक्रमासाठी शिक्षक संघटनांचे पदाधिकारी श्री.आप्पासाहेब कुल, श्री.विकास भाऊ शेलार,श्री. शांताराम काका जगताप,श्री. रामभाऊ दोरगे,श्री. बापूराव खळदकर , रहिमभाई शेख इ. उपस्थिती होते. कार्यक्रमाचे सूत्र संचालन श्रीम. गार्डी मॅडम जि.प. शाळा – धायगुडेवाडी क्र. १ यांनी केले व समारोप पाटस ब्रॅंचचे मॅनेजर अनिल बोडके व श्रीम मेघा जगदाळे यांनी आभार मानले.




