Home चंद्रपूर स्वच्छतेच्या मोहीमेत ग्रामस्थांनी सक्रीय सहभाग नोंदवावा-विवेक जॉनसन

स्वच्छतेच्या मोहीमेत ग्रामस्थांनी सक्रीय सहभाग नोंदवावा-विवेक जॉनसन

130

 

चंद्रपुर (प्रतिनिधी) केंद्र व राज्य शासनाच्या वतीने सुरु असलेल्या स्वच्छता ही सेवा अभियानात जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींनी सक्रीय सहभाग नोंदविण्याचे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉनसन यांनी केले आहे.

दिनांक 15 सप्टेंबर ते 2 ऑक्टोंबर 2023 या कालावधीत केंद्र व राज्य शासनाच्या वतीने स्वच्छता ही सेवा अभियान कचरा मुक्त भारत या संकल्पनेवर आधारित असुन, या मोहिमेत जिल्ह्यातील ग्रामपंचायती, शाळा, अंगणवाडी, प्राथमिक आरोग्य केंद्र या ठिकाणी लोकसहभागातुन स्वच्छतेचे विविध उपक्रम राबविण्याची प्रक्रिया सुरु आहे.

तालुका स्तरावर स्वच्छता रन कार्यक्रमाचे आयोजन करणे, गाव स्तरावरील सफ़ाई कर्मचा-यांचा सन्मान करणे, एकदिवस माझ्या गावच्या स्वच्छतेसाठी या कार्यक्रमाचे आयोजन करणे, सार्वजनिक परिसराची स्वच्छता करणे, स्वच्छता संवाद कार्यक्रमाचे आयोजन करणे, स्वच्छता फ़ेरी, स्वच्छता शपथ आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्याबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉनसन यांनी संबधीत यत्रंणेला सुचना दिल्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here