Home महाराष्ट्र धरणगांव येथे सत्यशोधक समाज संघाची बैठक उत्साहात संपन्न !.. सत्यशोधक चळवळीचा...

धरणगांव येथे सत्यशोधक समाज संघाची बैठक उत्साहात संपन्न !.. सत्यशोधक चळवळीचा इतिहास प्रेरणादायी !.. – डॉ.सुरेश झाल्टे.

157

 

धरणगांव प्रतिनिधी – पी.डी.पाटील सर

धरणगांव – शहरातील मोठा माळीवाडा येथील संत सावता माळी समाज सुधारणा पंचमंडळ समाज मढी येथे सत्यशोधक समाज संघाची अभ्यासगट व चर्चा बैठक उत्साहात संपन्न झाली. या बैठकीचे प्रास्ताविक सत्यशोधक समाज संघाचे जिल्हा समन्वयक पी डी पाटील यांनी केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी समस्त माळी समाजाचे अध्यक्ष विठोबा नामदेव महाजन होते. प्रमुख मार्गदर्शक सत्यशोधक समाज संघाचे राज्य सचिव डॉ.सुरेश झाल्टे ( धुळे ), सत्यशोधक समाज संघाचे जिल्हा समन्वयक विजय लुल्हे ( जळगांव ), विधीकर्ते शिवदास महाजन ( एरंडोल ) पाटील उपस्थित होते.
प्रथमतः संत शिरोमणी सावता महाराज, राष्ट्रपिता महात्मा जोतीराव फुले व विद्येची देवता सावित्रीमाई फुले यांना वंदन करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष्यांनी सर्व मान्यवरांचे शाल, पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. सर्व मान्यवरांच्या शुभहस्ते सत्यशोधक अधिवेशन पत्रिकांचा धरणगांव शहरात शुभारंभ करून सर्वांना पत्रिका वाटप करण्यात आल्या. डॉ.सुरेश झाल्टे यांनी सत्यशोधक चळवळीचा इतिहास उलगडला. सत्यशोधक समाज संघाचे महत्त्व सांगून सत्यशोधक विचारांवर चालण्याची गरज आहे. महाराष्ट्रात सत्यशोधक विधीकर्ते निर्माण करून प्रत्येकाने सत्यशोधक विधीप्रमाणे विधी करावेत असे आवाहन केले. पी.डी.पाटील यांनी येत्या २४ सप्टेंबरला नाशिक येथे राज्यस्तरीय अधिवेशनाचे साक्षीदार व्हावे असे आवाहन केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष विठोबा माळी, रामकृष्ण महाजन यांनी आम्ही गाडी करून नाशिक येथे अधिवेशनाला नक्की येऊ असे आश्वासन दिले.
याप्रसंगी धरणगाव शहरातील लहान माळीवाडा माळी समाजाचे अध्यक्ष रामकृष्ण महाजन, उपाध्यक्ष निंबाजी महाजन, शिवाजी देशमुख, सचिव गोपाल माळी, पुंडलिक महाजन, कोषाध्यक्ष व्ही.टी.माळी, राजेंद्र महाजन, माळी समाजाचे विश्वस्त विजय महाजन, जेष्ठ पंच सुकदेव महाजन,रावा धनलाल माळी, माजी सचिव दशरथ महाजन, सहसचिव दिपक महाजन, डिगंबर महाजन, धरणगाव तालुका अधिकृत पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष आबासाहेब राजेंद्र वाघ, पाटील समाज पंच मंडळाचे कोषाध्यक्ष लक्ष्मणराव पाटील, जलदूत फाउंडेशनचे नितेश महाजन, कैलास माळी, राष्ट्रीय किसान मोर्चाचे तालुकाध्यक्ष गोरक देशमुख तसेच शहरातील बंधू-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार सत्यशोधक समाज संघाचे प्रचारक एच.डी.माळी यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here