Home महाराष्ट्र हिंदी भाषा रोजगार व करिअर साठी वरदान ठरली आहे – प्रा. डॉ....

हिंदी भाषा रोजगार व करिअर साठी वरदान ठरली आहे – प्रा. डॉ. संदीप कीर्दत (छत्रपती शिवाजी कॉलेज सातारा)

86

“हिंदी रोजगार भिमुख भाषा असून आज व्यापार, पर्यटन, वाणिज्य, जनसंचार माध्यम, पत्रकारिता, रेल्वे,अनुवाद, फिल्म, राज्यसेवा, लोकसेवा, बँक, समालोचन, कला, संगीत,दुभाषे गाईड इत्यादी क्षेत्रांमध्ये या भाषेचे ज्ञान अत्यंत आवश्यक असून करिअरसाठी ती वरदान ठरली आहे. लोकसेवा आयोगातील कित्येक पदाच्या परीक्षा साठी या भाषेचे सामान्य तसेच सखोल ज्ञान असणे अत्यंत आवश्यक आहे. हिंदी भाषेमुळे भारत ही जगातील सर्वात मोठी बाजारपेठ बनला आहे. भारताच्या अर्थव्यवस्थेमध्ये सोशल मीडिया, जन संचार माध्यम,पत्रकारिता, पर्यटन, अनुवाद, दुभाषे गाईड, संगीत, फिल्म, यामध्ये हिंदी भाषेचा वापर मागील दहा पेक्षा दुपटीने होत असून हे हिंदी भाषेच्या व्यापकतेचे लक्षण असून भविष्यात ज्या आंतरराष्ट्रीय भाषा राहतील त्यामध्ये हिंदीला अग्रणीय स्थान राहील.” असे प्रतिपादन प्रा. डॉ. संदीप किर्दत यांनी आपल्या भाषणात केले.
श्रीराम एज्युकेशन सोसायटी संचलित नामदेवराव सूर्यवंशी (बेडके) महाविद्यालयात शुक्रवार दिनांक 15/09/2023 रोजी ‘हिंदी दिवस समारोह’ कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉक्टर उदय जाधव होते. हिंदी विभाग प्रमुख प्रा. डॉ. एस. एस. बिचुकले, प्रा श्री श्रेयस कांबळे, प्रा डॉ दीपक राऊत, प्रा कु वनिता कोळेकर यांच्या सह महाविद्यालयातील प्राध्यापक प्राध्यापिका व विद्यार्थी उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात माता सरस्वतीच्या प्रतिमा पूजन व दीप प्रज्वलनाने करण्यात आली.
डॉ. संदीप किर्दत पुढे म्हणाले, “देश स्वातंत्र्य, साहित्य, राष्ट्र निर्माण, मानवता विकास, राष्ट्रीय सामाजिक- धार्मिक एकता यामध्ये हिंदी भाषाचे अमूल्य योगदान आहे. आपण आपल्या राष्ट्रभाषेला प्राथमिकता दिली पाहिजे. हिंदी ही स्वभाषा, एकात्मता, संस्कृती, राष्ट्रीय चेतना, सुवर्ण इतिहास व सन्मानाचे प्रतीक आहे. आज हिंदी केवळ राजभाषा, राष्ट्रभाषा, जनभाषा, संपर्क भाषा, एशियाची भाषा यापुरती मर्यादित राहिली नसून वरील सर्व सोपस्कार पूर्ण करुन ती जागतिक भाषेच्या दृष्टीने अग्रेसर होत आहे आणि म्हणूनच संयुक्त राष्ट्र संघ – युनोच्या – सर्व सदस्यांनी एकमताने हिंदी भाषेला विश्व भाषेचा दर्जा दिला आहे. त्यामुळे आपण दि. १० जानेवारी हा दिवस विश्व हिंदी भाषा दिवस म्हणून साजरा करत आहोत. हिंदी भाषा सर्व क्षेत्रांमध्ये वापरली जाते व त्यामध्ये रोजगाराच्या प्रचंड संधी आहेत. हिंदी भाषेचे भविष्य उज्वल असून, हिंदी भाषा बोलणे हे आपले राष्ट्रीय कर्तव्य आहे. हिंदी भाषेचे माधुर्य, अभिव्यक्ती क्षमता, व्यापकता, जनसंपर्क यासाठी भाषेचा अधिकाधिक वापर होत आहे.”त्यांनी कुमार विश्वास, अमिताभ बच्चन, नरेंद्र मोदी, गुलजार, अंजना कश्यप इत्यादींचे जीवनातील मार्मिक प्रसंग सांगून त्यांच्या यशस्वीते मध्ये हिंदी भाषेचे महत्व अधोरेखित केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक हिंदी विभाग प्रमुख प्रा डॉ संदेश बिचुकले यांनी केले त्यामध्ये त्यांनी हिंदी भाषेची व्यवहारिक उपयोगिता, व्याप्ती, आवश्यकता, महत्त्व तसेच हिंदी विभागाचा आढावा सादर केला व सेंट्रल बँक शाखा फलटण व हिंदी विभाग च्या संयुक्त विद्यमाने (दिनांक 18 /9/ 2023) रोजी आयोजित निबंध व वक्तृत्व स्पर्धा याबद्दल विद्यार्थ्यांना माहिती दिली. आभार प्रदर्शनाचे कार्य प्रा श्री श्रेयस कांबळे यांनी केले. मान्यवरांचा सत्कार प्रा डॉ दीपक राऊत यांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व अतिथी परिचय प्रा डॉ संदेश बिचुकले यांनी करून दिला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here