Home यवतमाळ बोरी (चातारी ) ते तहसिल उपोषण स्थळापर्यन्त लक्षवेधी ट्रॅक्टर रॅली

बोरी (चातारी ) ते तहसिल उपोषण स्थळापर्यन्त लक्षवेधी ट्रॅक्टर रॅली

105

 

✒️ सिद्धार्थ दिवेकर (जिल्हा प्रतिनिधी, यवतमाळ) मो.9823995466

उमरखेड (दि. 16 सप्टेंबर) मराठा आरक्षणासाठी उमरखेड तहसिल कार्यालयासमोर सुरू असलेल्या साखळी उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी बोरी, कोपरा, माणकेश्वर, ब्राम्हणगाव येथील मराठा समाज बांधवांनी मराठवाडा सिमेवरील बोरी ते तहसिल कार्यालयासमोर सुरु असलेल्या उपोषण स्थळा पर्यन्त वाजत गाजत भगवे झेंडे फडकावित शेकडो ट्रॅक्टर वाहनांची रॅली काढली.

सरकारच्या निषेधार्थ आरक्षण आमच्या हक्काचे, नाही कुणाच्या बापाचे ‘ या घोषणांनी परिसर दुमदुमुन गेला होता.
रॅलीत शेकडो, स्त्री पुरुष व बालके सहभागी झाले होते.

छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन केल्यानंतर स्थानिक शहरातून प्रमुख मार्गाने ट्रॅक्टर रॅली जात असतांना राष्ट्रीय महामार्गावर काही वेळ वाहतुक ठप्प झाली होती.

आंदोलन काळात पोलीसांची चांगलीच तारांबळ होत असल्याचे दिसून येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here