अनिल साळवे, विशेष प्रतिनिधी मो. 86985 66515
गंगाखेड (प्रतिनिधी) सोलापूर जिल्ह्यात भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र राज्य महसूल मंत्री मा.राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अंगरक्षकांनी धनगर समाज बांधव शेखर बंगाळे धनगर आरक्षण प्रश्नावर विचारपूस करत असताना अंगरक्षकांनी बेदम मारहाण केली आहे. त्यामुळे धनगर समाजातील बांधव मारहाणीच्या निषेधार्थ एकनाथजी शिंदे मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांना तहसीलदार गंगाखेड यांच्यामार्फत निवेदनाद्वारे कळविले आहे.
धनगर आरक्षण प्रश्नावर राधाकृष्ण विखे पाटील सोलापूर मध्ये आले असता धनगर समाज बांधव बंगाळे यांनी धनगर प्रश्नावर चर्चा सुरू असताना अचानक अंगरक्षक व भाजपा शहराध्यक्ष यांनी बेदम मारहाण केली. त्यामुळे मारणीचा तीव्र निषेध व्यक्त करण्यात येत असून या जुलमी कारवाईच्या विरोधात संबंधितावर लवकरात लवकर कारवाई करावी अन्यथा धनगर समाज बांधवांचे वतीने मोर्चे, आंदोलन करण्यात येईल असा इशाराही देण्यात आलेला आहे.
यावेळी धनगर आरक्षण प्रश्नावर घोषणा देण्यात आल्या. निवेदनावर धनगर समाज बांधव नारायण सर्वदे, नारायण घनवटे, जितेश गोरे, डॉ.दिपेंद्र अळलुरे, जयदेव भिसे,मुंजाभाऊ भुमरे माऊली घुले,दरसिंग भूसणार, पिराजी भुमरे, गोविंद खटिंग, वैजनाथ भडारे, गोविंदराव मानवतकर, सखाराम बोबडे पडेगावकर, गजानन पारवे, इत्यादींच्या स्वाक्षऱ्या आहेत.




