Home Breaking News शेतकरी, शेतमजूर, ऊसतोड कामगार व गंगाखेड शुगर्स घोटाळा प्रकरणी हजारोंच्या संख्येने मोर्चा...

शेतकरी, शेतमजूर, ऊसतोड कामगार व गंगाखेड शुगर्स घोटाळा प्रकरणी हजारोंच्या संख्येने मोर्चा उपविभागीय अधिकारी कार्यायलावर धडकला.

98

 

अनिल साळवे, विशेष प्रतिनिधी मो. 86985 66515

गंगाखेड (प्रतिनिधी ) गंगाखेड येथे दिनांक 11सप्टेंबर 23 सोमवार रोजी गोदातट बालाजी मंदिर पासून, मुख्यबाजार पेठ, पोलीस स्टेशन, तहसील कार्यालय समोरून उपविभागीय अधिकारी कार्यालय गंगाखेड येथे धडकला.

– परभणी जिल्ह्यात कोरडा दुष्काळ जाहीर करावा.
– रखडलेले अतिवृष्टीचे अनुदान देण्यात यावे तसेच पीकविमा मंजूर करावा.
– शेतकऱ्यांना किमान 8 तास सुरळीत लाईट देण्यात यावी तसेच वीज कनेक्शन तोडू नयेत.
– गंगाखेड शुगर्स घोटाळा प्रकरणी बाधित शेतकऱ्यांचे पैसे त्वरित देण्यात यावे. या प्रमुख मागण्या सह हजारोंच्या संख्येने मोर्चा काढण्यात आला. या मोर्चास संबोधित करताना गंगाखेड विधानसभा मतदार संघाचे आ.श्री.सिताराम घनदाट (मामा), यांनी आमदार रत्नाकर गुट्टे यांना आव्हान केले की, या चार वर्षात एखादी योजना राबवली आहे का ती दाखवा मी आमदार असताना केलेल्या कामाची पुस्तके छापून वस्तुस्थिती जनते समोर मांडली मी जनतेचे काम करतच राहणार येणारी विधानसभा मी लढवणारच पण सध्या गंगाखेड शहरात गुंडागिरीची दहशत माजवून, शेतकऱ्याच्या परस्पर कर्ज घेऊन कर्जबाजारी करून, गुट्टे यांची मनमानी सुरु ठेवली आहे तसेच त्यांच्या विरोधात कुणी आवाज उचला तर गुंडा मार्फत मारहाण करणे आज ह्याला मार उद्या त्याला मार आसे करून मतदार संघात दादागिरी सुरु आहे हि दादागिरी मोडीत काडावी आसे आव्हान करण्यात आले.यावेळी परभणी जिल्ह्याचे खासदार संजय जाधव यांनी मोर्चाला संबोधित करताना म्हटले की, आमदार रत्नाकर गुट्टे यांनी मी जर फसवणूक केली असेल तर माझ्या विरोधात मोर्चा काडा तो आम्ही काडला व जे शेतकऱ्या च्या शेतीवर कर्ज परस्पर उचले आहे आसे शेतकरी मोर्चात सहभागी झाले त्यांनी त्यांची व्यथा मांडली. असून गंगाखेड मतदार संघात गंगाखेड शुगर च्या नावाने साखर कारखाना चालवताना शेतकऱ्याच्या नावावर परस्पर कर्ज उचलून घेतले असून ज्या शेतकऱ्याच्या नावावर कर्ज उचले आहे त्या शेतकऱ्यास माहिती सुद्धा नाही, त्या बँकेचे नाव काय आहे हे पण माहित नसून आशा ज्या बँकेचे बँक निहाय सर्व बँकाच्या जवाबदार बँक अधिकारी यांची सीबीआय मार्फत चौकशी करण्यात यावी अशी शासनाकडे मागणी करणार आहोत,
त्याच बरोबर आमदार रत्नाकर गुट्टे यांना शेतकऱ्याची फसवणूक करत असतना भारतीय जनता पार्टी यांना पण आपण सर्व शेतकऱ्यांनी आता ओळखल पाहिजे. आजच्या परस्थितीत आजचे सरकार शासन आपल्या दारी अस म्हणत शेतकऱ्यांना साधा विद्युत पुरवठा देऊ शकत नाही फक्त जाहिरात करत सामान्य शेतकरी बांधवाना फसवत आहे. तसेच शेतकऱ्याचे सिबिल खराब करून आपण केलेले पाप झाकण्या साठी गंगाखेड शुगर दिवाळ खोरीत निघाले ची जाहिरात करून बनवाबनवी करू नये, आजचा मोर्चा केवळ झाकी आहे, शेतकऱ्याचे सिबिल जो पर्यंत कोरे होत नाही तो पर्यंत हा लढा सुरूच राहील यावेळी ज्योतीताई ठाकरे श्रीकांत भोसले, विशाल कदम, भगवान सानप, मनोहर महाराज केंद्रे,यांनी आपले मनोगत व्यक्त केले. तसेच या मोर्चास उपस्तित श्री.विशाल कदम (शिवसेना जिल्हाप्रमुख), भगवान सानप (भारत राष्ट्र समिती)श्री. भरतदादा घनदाट (प्रदेश राष्ट्रवादी सरचिटणीस) श्री.श्रीकांत भोसले (विधानसभा अध्यक्ष राष्ट्रवादी गंगाखेड) बालाजी देसाई, मनोज काकानी,.अनिल सातपुते, सखुबाई लटपटे आदिसह उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here