आज मराठी व सेमी इंग्रजी शाळांना विद्यार्थी मिळत नाही. याचे कारण असे आहे की, इंग्रजी शाळांची वाढलेली संख्या यापूर्वी सेमी इंग्रजी माध्यमाकडे काही पालकांचा कल होता. परंतू आज मराठी व सेमी इंग्रजी जवळपास सारखेच झाले आहे. सेमी इंग्रजीच्या शाळांना काहीसे विद्यार्थी मिळतात, त्यात ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची संख्या व शहरी भागातील गरीब विद्यार्थ्यांची संख्या जास्त असते. सधन पालक बहुधा इंग्रजी शाळेतच आपल्या पाल्यांचा प्रवेश घेतो.
ग्रामीण भागात प्रत्येक गावी जिल्हा परिषदांच्या प्राथमिक शाळा आहेत. पण तेथील पटसंख्या फार कमी झालेली आहे. खेड्यापाड्यात आज इंग्रजी शाळांची वाहने जावून विद्यार्थी आणतात. माध्यमिक शाळेत काही शिक्षक सेवानिवृत्त होत असल्याने शिक्षक अतिरिक्त होत नाही. पण यापुढे पटसंख्या टिकणे, टिकविणे ही तारेवरची कसरत ठरणार आहे.एकदा का पटसंख्या कमी झालीच तर ती पुढे भरून काढणे फार मोठी कठीण बाब आहे.
खाजगी मराठी शाळांना पटसंख्येचे बंधन आहे. जिल्हा परिषद शाळांना नाही. हे बंधन शिथिल होणे गरजेचे आहे. यासाठी पंचायत समिती स्तरावर इयत्ता १ ली १० साठी केंद्रिय प्रवेश पद्धती निर्माण करणे गरजेचे आहे. ही पद्धती जर निर्माण केली नाही. तर बहुतेक शाळातील शिक्षक अतिरिक्त ठरण्याचाही धोका जास्त निर्माण होईल. शिक्षकात अनावश्यक स्पर्धा निर्माण झालेली आहे.ती पुढे वाढत जाणार! आजच्या काळात कितीही मेहनत शिक्षकांनी घेतली तरीही विविध प्रकारची आमिषे दाखविल्याशिवाय काहीच होत नाही.
अनेक कार्यक्रम, सहशालेय उपक्रम, शॆक्षणिक सहल, स्नेहसम्मेलन घेवून जर विद्यार्थी शाळेत वाढत असतील तर शिक्षकांचा भ्रमनिरास आहे.काही लोकांना शिक्षण महत्त्वाचे नाही. मला काय मिळते हे महत्वाचे आहे.संघटना शिक्षकांच्या अनेक समस्या,प्रश्नावर सातत्याने प्रयत्न करते. पण आज शाळा व शिक्षक टिकून राहणे गरजेचे आहे.सर्वोच्च प्राधान्याने एक गोष्ट करणे फार महत्त्वाचे आहे, शाळाप्रवेशासाठी केंद्रिय प्रवेश पद्धती निर्माण करावी व जिल्हा परिषदेप्रमाणे खाजगी शाळांना पटसंख्येचे बंधन नसावे.
राजेंद्र मोहितकर(प्रसिद्धी प्रमुख महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद चंद्रपूर जिल्हा ग्रामीण)मो:-9422909525