Home महाराष्ट्र सत्यशोधक समाजाचे राज्यस्तरीय अधिवेशन २४ सप्टेंबर ला नाशिक येथे संपन्न होणार..

सत्यशोधक समाजाचे राज्यस्तरीय अधिवेशन २४ सप्टेंबर ला नाशिक येथे संपन्न होणार..

101

🔸महाराष्ट्रातील सर्व सत्यशोधकांनी या ऐतिहासिक अधिवेशनाला नक्की यावे – सत्यशोधक अरविंद खैरनार

✒️प्रतिनिधी धरणगाव(पी.डी.पाटील सर)

नाशिक(दि.31ऑगस्ट):- दि. २७ ऑगस्ट २०२३ रोजी नाशिक शहरातील सिटू भवन, नगर येथे पहिली नियोजन बैठक संपन्न झाली प्रसंगी राष्ट्रपिता सत्यशोधक महात्मा ज्योतिराव फुले यांच्या सत्यशोधक समाजाला १५० वर्षपूर्ती होत आहे व सत्यशोधक चळवळीचे संशोधक प्रा.हरी नरके यांच्या स्मृती निमित्त सत्यशोधक समाजाचे राज्य अधिवेशन दि. २४ सप्टेंबर २०२३ रोजी नाशिक येथे संपन्न करायचे एकमुखाने ठरले. प्रास्ताविक डॉ.सुरेश झाल्टे यांनी केले.सुरूवातीला उदघाटन सत्र होईल.

एक सत्र :- सत्यशोधक प्रा. हरी नरके यांना समर्पित केले जाणार आहे,दुसरे सत्र :-सत्यशोधक समाजाची चळवळ काळाची गरज, तिसरे सत्र :- वर्तमानातील शेतकरी, शैक्षणिक धोरण व त्यात सत्यशोधक चळवळीची भूमिका अशाप्रकारे एक दिवसीय अधिवेशन संपन्न होणार आहे. सदर अधिवेशन यशस्वी करण्यासाठी सर्व परिवर्तनवादी संघटनांची मदत घेऊन हे अधिवेशन यशस्वी करण्याचे एकमुखाने ठरले.

याप्रसंगी सत्यशोधक समाज संघाचे अरविंद खैरनार, सुदर्शन जाधव, डॉ. डी.बी.शेंडे, डॉ.सुरेश झाल्टे, अनिल भालेराव, दौलत शेलार,भाऊसाहेब जाधव विश्वासराव पाटील, विधी कर्ते भगवान रोकडे, नरेंद्र जाधव, साळूबा पांडव, रामचंद्र सोनवणे, कैलास जाधव, विजय लुल्हे, रवींद्र तितरे, सुरेश डॉ.महाजन ,अनिल माळी, प्रकाश महाजन ,माळी सर, सपकाळे, रमेश वराडे, रमेश जगताप सर, स्वप्नील महाजन, रमेश बच्छाव, हेमंत जाधव, संजय पवार,चंद्रकांत चव्हाण, सागर मुंजवाडकर, मुकेश कापुरे, निकम नाना, उमेश उबाळे प्रकाश बागुल ,एकनाथ सोनवणे, राजेंद्र दरोडे, सुनील देवरे,अशोक मंडलिक,भारत जाधव, मनोहर शेलार, गोविंदराव सोनवणे,सुरेश आहिरराव, कैलास खैरनार सर,यशवंत जाधव, रमेश खैरनार,आदी.प्रा.वसंतराव गोवर्धने, प्रा.अशोक सोनवणे तसेच म. फुले समता परिषदेचे संतोष पुंड , विस्तार अधिकारी डी पी निकुंभ सर, सत्यशोधक प्रा डॉ.भोज आदी मान्यवर मिटिंग साठी उपस्थित होते.

या सभेचे सूत्रसंचालन आप्पा जगताप यांनी तर आभार सिटू जिल्हा सरचिटणीस सतिश खैरनार यांनी केले. मिटिंग यशस्वीतेसाठी जयराम सोनवणे, श्रीराम सोनवणे, संदीप बच्छाव यांनी मेहनत घेतली.सदर बैठकीसाठी नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव औरंगाबाद,अहमदनगर, पुणे जिल्ह्यातील कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here