सिध्दार्थ दिवेकर (जिल्हा प्रतिनिधी,यवतमाळ) मो.9823995466
उमरखेड (दि. 29 ऑगस्ट) आयुष्यात प्रत्येक मनुष्य आपल्या जीवनाचे ध्येय ठरवीत असतो. परंतु फार कमी लोक निश्चित ध्येयापर्यंत पोहोचत असतात. उमरखेड तालुक्यातील धनंज या छोट्याशा खेड्यातील रहिवासी आरती दिगंबर साबळे या तरुणीची गणना करावी लागेल.
धनज या छोट्याशा खेड्या तील आदिवासी शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या येथीलच जिल्हा परिषदेच्या शाळेत प्राथमिक शिक्षण, तर जवाहरलाल नवोदय विद्यालय घाटंजी यवतमाळ येथे माध्यमिक ,तर डॉ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अमरावती येथील पदवीचे शिक्षण घेतले.
कुमारी आरती दिगंबर साबळे यांची कृषी अधिकारी पदी निवड झाल्याबद्दल प्रत्यक्ष अंबादास धुळे आणि त्यांचे मित्र मंडळ यांनी सत्कार केला.
यावेळी हाणवंतराव भडंगे मा सरपंच, दत्तप्रसाद जाधव, मा.सरपंच संभाजी भडंगे, बँक प्रतिनिधी रघुनाथ यव्हारे साहेब, तातेराव भडंगे, जयराम कराळे, अमोल आमले, लक्ष्मिन गायकवाड, किसन उगले, आशिष डोंगरे, गजानन बोडके, संदिप झाडे, सुनिल हनवते तसेच अंबादास धुळे मित्र मंडळ तरोडा,जिल्हा परिषद सर्कल पोफाळी यांनी प्रत्यक्ष भेट देऊन सत्कार करून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्यात.
त्याच बरोबर गाव तालुक्यातील सर्व स्तरावरून आरती साबळे यांची तालुका कृषी अधिकारी पदी निवड झाल्याबद्दल शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. त्याचबरोबर आनंदही व्यक्त केला जात आहे.




