सिध्दार्थ दिवेकर(जिल्हा प्रतिनिधी,यवतमाळ)मो:-9823995466
उमरखेड(दि.27 ऑगस्ट):-इस्रो या नामांकित संशोधन संस्थेस सर्वात जास्त शास्त्रज्ञ पुरविणारी शिक्षण संस्था म्हणजे तिरुअंनतपूरम येथील IISER ही संस्था होय.
या संस्थेत उमरखेड सारख्या ग्रामीण भागातील गो.सी. गावंडे कनिष्ठ महाविद्यालयातील विज्ञान शाखेच्या विद्यार्थिनीस प्रवेश मिळाला ही अंत्यत कौतुकास्पद बाब होय.
डॉक्टर इंजिनीयर हा पारंपारिक मार्ग सोडून उमरखेड सारख्या ग्रामीण भागातून IISER सारख्या नामांकित संस्थेतून करिअर करण्याचा मार्ग येथील गो.सी .गावंडे महाविद्यालयाच्या कुमारी समृद्धी शंकरराव मुनेश्वर हिने स्वीकारला देशपातळीवरील संस्था IISER आयोजित अटीट्युड चाचणी मधून कुमारी समृद्धी ची निवड तिरुअनंतपुरम येथे पाच वर्षाच्या अभ्यासक्रमासाठी झाली आहे.
कुमारी समृद्धीही गो.सी गावंडे महाविद्यालयात चालणाऱ्या जिनीअस बॅचची विद्यार्थिनी असून तिने हे यश कुठल्याही खाजगी शिकवणी वर्गा शिवाय मिळविले आहे.
फक्त या महाविद्यालयातील शिक्षकांच्या नियमीत क्लास मधून हे उल्लेखनीय यश प्राप्त केले.ही विषेश बाब आहे.समृद्धीने या यशाचे श्रेय कनिष्ठ महाविद्यालयाच्या सर्व प्राध्यापकांना दिले आहे.
तिला मिळालेल्या यशाबद्दल तिचे कौतुक व अभिनंदन संस्थेचे अध्यक्ष मा. राम देवसरकर, मा. सचिव डॉ. राऊत साहेब यानी केले असुन महाविद्यालयाच्या वतीने कु. समृद्धी चा पालकांसमवेत सत्कार करण्यात आला.
या प्रसंगी प्राचार्य डॉ. एम.बी. कदम सर, प्रा. डॉ. धनराज तायडे सर, उपप्राचार्य प्रा. पी.एम. गुजर सर, पर्यवेक्षक प्रा.बी. यु. लाभसेटवार सर व सर्व कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राध्यापक वृंद उपस्थित होते.
तसेच समृद्धीच्या या यशाचे कौतुक महाविद्यालयाचे व्यवस्थापक मंडळ व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांच्याकडून होत आहे.




