Home महाराष्ट्र मतदार जनजागृती तथा नव मतदान नोंदणी अभियान कार्यक्रम संपन्न

मतदार जनजागृती तथा नव मतदान नोंदणी अभियान कार्यक्रम संपन्न

102

✒️सुयोग सुरेश डांगे(विशेष प्रतिनिधी)

चिमूर(दि.24ऑगस्ट):-आठवले समाजकार्य महाविद्यालय शेडेगाव कॅम्पस येथे दिनांक २४ ऑगस्टला तहसील कार्यालय चिमूर चे सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी यांच्या सूचनेनुसार राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने मतदार जनजागृती तथा नव मतदान नोंदणी अभियान कार्यक्रम आयोजित करण्यात आला.

कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. शुभांगी वडस्कर, अतिथी निशिकांत मेहरकुरे, पर्यवेक्षक सचिन कापसे (शिक्षक ) बी. एल. ओ. यांच्या उपस्थितीत कार्यक्रमांची सुरुवात झाली.

निशिकांत मेहरकुरे ( शिक्षक ) यांनी मतदारांनी जागरूक राहावे व मतदानापासून वंचीत राहू नये यासाठी प्रयत्न करावे असे मत मांडले. सचिन कापसे (शिक्षक ) बी. एल. ओ. या नात्याने विद्यार्थ्यांचे फॉर्म भरून घेतले.. महाविद्यालयच्या प्राचार्य डॉ. वडस्कर यांनी समाजकार्याच्या विद्यार्थ्यांनी क्षेत्र कार्याच्या माध्यमातून परिसरात जनजागृती करावी असे मौलिक मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाचे सूत्र संचालन डॉ. सी. जे. खंगार कार्यक्रम अधिकारी रा. से. यो. यांनी केले. आभार प्रदर्शन डॉ. प्रीती दवे यांनी केले. कार्यक्रमांची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here