सिध्दार्थ दिवेकर (जिल्हा प्रतिनिधी यवतमाळ) मो. 9823995466
यवतमाळ (दि. 17 ऑगस्ट) जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, यवतमाळ यांच्या कडून राज्य आवास योजना ग्रामीण अंतर्गत उत्कृष्ट कार्य करणारे जिल्ह्यातील तीन तालुके, तीन क्लस्टर व तीन ग्राम पंचायती यांना जिल्हास्तरीय पुरस्कार दिनांक 15 ऑगस्ट 2023 रोजी देऊन गौरविण्यात आले आहे.
त्यानुषंगाने ग्राम पंचायतीचे गुणांकनानुसार आपले ग्राम पंचायतीने उत्कृष्ट काम केल्याने दिनांक 15 ऑगस्ट 2023 रोजी मा. पालकमंत्री, यवतमाळ यांचे हस्ते मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद कार्यालय यवतमाळ येथे सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन प्रविण किसनराव कदम ग्राम पंचायत टाकळी (ई) आणि सरपंच सौ. उज्वला प्रभाकर हाके यांना राज्य आवास योजनेत यवतमाळ जिल्हात प्रथम क्रमांक पटकावलामुळे गौरविण्यात करण्यात आला आहे.
यावेळी डॉ. पंकज आशिया जिल्हा अधीकारी, यवतमाळ, डॉ,पवन बनसोड (पोलीस अधीक्षक,यवतमाळ) तसेच उमरखेड पंचायत समितीचे गट विकास अधिकारी प्रवीणकुमार वानखेडे इत्यादी अनेक विभागाचे अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.




