अनिल साळवे(गंगाखेड प्रतिनिधी)
गंगाखेड(दि.15ऑगस्ट):-जनसेवेचे व्रत असलेल्या लॉयन्स क्लब गंगाखेड गोल्डसिटी तर्फे आज स्वातंत्र्य दिनानिमित्त विविध उपक्रम राबविण्यात आले या मध्ये कस्तूरबा गांधी विद्यालय येथील अनाथ मुलीना गणवेश वाटप, शाळेतील विद्यार्थ्यांना फळवाटप, गोदावरी नदीच्या स्वच्छतेसाठी झटणार्या स्वच्छता दुतांचा सन्मान, शहरातील नागरिकांसाठी सेल्फी पॉइंट तसेच तालुक्यातील सर्व माजी सैनिकांचा सन्मान करण्यात आला.
याप्रसंगी लॉयन्स क्लब गंगाखेड गोल्डसिटी चे अध्यक्ष लॉ. श्रीधराचार्य जोशी, सचिव लॉ.भगत सुरवसे, कोषाध्यक्ष लॉ मकरंद चिनके, झोन चेअरपर्सन लॉ अतुल गंजेवार, कॅबिनेट ऑफिसर लॉ.गोविंद रोडे, संजय सुपेकर, जगदीश तोतला उपाध्यक्ष लॉ अभिनय नळदकर, लॉ संतोष टोले ,सहसचिव लॉ बालासाहेब यादव, लॉ बंडु घुले, लॉ दत्तात्रय परबत,लॉ नागेश कोनार्डे, लॉ अतुल तुपकर, लॉ महेन्द्र वरवडे, लॉ महेन्द्र कांबळे, लॉ गोविंद जाधव , लॉ बिभीषण गुट्टे , लॉ अंबादास राठोड , लॉ संदिप राठोड, लॉ मयुर कुलकर्णी, लॉ सदानंद कुलकर्णी, लॉ विनोद शिंदे, लॉ निखिल गुंडाळे, लॉ राजेश पाठक, लॉ चंद्रकांत गादेवार, लॉ रावण भालेराव, लॉ महेश अप्पा समगे, लॉ महेमुद शेख , लॉ प्रकाश टाक, लॉ संदिप राठोड,लॉ सदानंद पेकम , लॉ. नागेश केरकर, चंद्रकांत वरवडे सर आदी उपस्थित होते.




