सय्यद शब्बीर जागीरदार(विशेष प्रतिनिधी)
जिवती(दि.13ऑगस्ट):- तालुक्यात सध्या सुधीर भाऊ मुनगंटीवार यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने रक्तदान शिबिर पार पडल्यानंतर विविध गावात त्यांचे वतीने एकूण पांचावन लाखांच्या कामाचे आज भूमिपूजन सोहळे पार पडले असे ग्राम पंचायत गुडसेला येथे पंधरा लाख रुपये कामाचे भूमिपूजन करताना जिल्हा महामंत्री भारतीय जनता पक्षाचे माजी उपसभापती महेश राजे देवकते यांनी यावेळी माहिती दिली.
त्यावेळी नुकतेच संजय गांधी निराधार योजना समितीचे नवनिर्वाचित सदस्य राजू राजपंगे यांनी यावेळी तालुक्यात झालेल्या भूमिपूजन चा थोडक्यात आढावा दिला.त्यावेळी कामाचे भूमिपूजन करताना उद्घाटक म्हणून महेश देवकते, तर कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच मडावी उपस्थित होते.यावेळी भारतीय जनता पक्षाचे सामाजिक कार्यकर्ते शामलाल नामपल्ले,आनंद दादा पवार, चंद्रमणी वाघमारे,आनंद हरगीले,ग्राम पंचायत सदस्य अनुसया मडावी,दौलत रायसिडाम,सोमु आत्राम उपस्थित होते.




