Home महाराष्ट्र शब्दगंध साहित्य संमेलनात सहभागासाठी नवोदितांना कविता पाठवण्याचे आवाहन

शब्दगंध साहित्य संमेलनात सहभागासाठी नवोदितांना कविता पाठवण्याचे आवाहन

101

✒️अहमदनगर(पुरोगामी न्यूज नेटवर्क)

अहमदनगर(दि.11ऑगस्ट):-शब्दगंध साहित्यिक परिषद, महाराष्ट्र राज्य च्या वतीने ऑक्टोबर च्या पहिल्या आठवड्यात अहमदनगर येथे राज्यस्तरीय शब्दगंध साहित्य संमेलन घेण्यात येणार असून या संमेलनात होणाऱ्या काव्य संमेलनामध्ये सहभागी होऊ इच्छिणाऱ्या कवी,कवयित्रींनी आपल्या कविता पाठवाव्यात.असे आवाहन शब्दगंध चे संस्थापक सुनील गोसावी व कार्याध्यक्ष प्रा.डॉ.अशोक कानडे यांनी केले आहे.

शब्दगंध साहित्यिक परिषदेचे अध्यक्ष राजेंद्र उदागे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीतील निर्णयानुसार नवोदित कवी,कवयित्रींना साहित्य संमेलनामध्ये मोठ्या प्रमाणात सहभागी करून घेण्यात येणार असून त्यासाठी आपल्या स्वरचित, अप्रकाशित दोन छोट्या कविता, परिचय, पासपोर्ट फोटो, व पोस्टाची रुपये पाच ची पाच तिकिटे दिनांक ३० ऑगस्ट २०२३ पर्यंत फुलोरा, लक्ष्मी कॉलनी, भिस्त बाग महाला जवळ, तपोवन रोड, सावेडी, अहमदनगर ४१४००३ मो. ९९२१००९७५० येथे पाठवावे, असे आवाहन पंधराव्या राज्यस्तरीय साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष आमदार संग्राम भैय्या जगताप, संयोजन समितीचे अध्यक्ष ज्ञानदेव पांडुळे,शब्दगंध चे अध्यक्ष राजेंद्र उदागे,उपाध्यक्ष प्राचार्य डॉ.गुंफा कोकाटे, शाहीर भारत गाडेकर, भगवान राऊत, सुभाष सोनवणे,अजयकुमार पवार, किशोर डोंगरे,राजेंद्र पवार बबनराव गिरी, शेवगाव चे अध्यक्ष हरिभाऊ नजन,नेवासा चे प्रा. डॉ.किशोर धनवटे, कोपरगावचे प्रा.डॉ.संजय दवंगे, राहूरी च्या जयश्री इंगळे झरेकर,राहत्याचे राजेंद्र फंड,पारनेरच्या स्वाती ठुबे, आष्टीचे बाळासाहेब शेंदूरकर पाथर्डीचे डॉ.अनिल पानखडे व काव्य संमेलन संयोजिका शर्मिला गोसावी यांनी केले आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here