Home यवतमाळ जागतिक आदिवासी दिनानिमित्त देशात सार्वजनिक सुट्टी जाहीर करा (भिल्ल नाईकडा आदिवासी...

जागतिक आदिवासी दिनानिमित्त देशात सार्वजनिक सुट्टी जाहीर करा (भिल्ल नाईकडा आदिवासी सेवा संघ व बिरसा क्रांती दल यांची मागणी )

153

 

✒️ सिध्दार्थ दिवेकर (जिल्हा प्रतिनिधी, यवतमाळ) मो.9823995466

उमरखेड (दि. 7 ऑगस्ट) 1992 पासून जागतिक स्तरावर विश्व मूलनिवासी दिन साजरा केल्या जात आहे.

आदिवासी दिन साजरा करताना आदिवासी समाजाच्या विविध समस्येवर जसे आदिवासी संस्कृती, आदिवासींची शैक्षणिक स्थिती सुधारणा, आदिवासीची भाषा संवर्धन करणे, आदिवासींची नैसर्गिक आणि संविधानिक अधिकाराचे संरक्षण करणे, अधिवाशांच्या जमिनी विषयक अधिकार, आदिवासीच्या राजकीय, सामाजिक आणि आर्थिक स्थितीत लक्षणीय बदल करण्यासाठी दहा – दहा वर्षाचे टप्पे पाडून नियोजन करणे व त्यावर कृती कार्यक्रम आखून तो राबविणे. यासाठी 9 ऑगस्ट या जागतिक आदिवासी दिनाचे आयोजन आहे.

एवढे उदात्त व भव्यदिव्य उद्देश ठेवून आदिवासी समाजाच्या विकासाचे धोरण जागतिक स्तरावर ठरविण्यात आले.

परंतु भारतीय स्तरावर अजूनही 9 ऑगस्ट हा दिन आदिवासी समाजाला समर्पित करण्यात आला नाही.
शासकीय स्तरावर साजरा ही केला जात नाही.

म्हणून आम्ही आपल्याला विनंती करतो की 9 ऑगस्ट 2023 या जागतिक आदिवासी दिनाचे औचित्य साधून शासकीय सुट्टी जाहीर करून आदिवासी जनतेचा सन्मान कायम ठेवावा.

अशी विनंती भिल्ल नाईकडा आदिवासी सेवा संघ यवतमाळ महाराष्ट्र आणि बिरसा क्रांती दल महिला शाखा तालुका उमरखेड यांच्या वतीने माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी (भारत सरकार, नवी दिल्ली) यांना उपविभागीय अधिकारी उमरखेड यांच्या मार्फत निवेदन देण्यात आले.

यावेळी भिल्ल नाईकडा आदिवासी सेवा संघ आणि बिरसा क्रांती दलचे अनेक कार्यकर्ते व महिला पदाधिकारी उपस्थित होत्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here