प्रकरण पोहचणार जिल्हाधिकाऱ्यांचे दरबारात !
सुयोग सुरेश डांगे(विशेष प्रतिनिधी)मो:-8605592830
चिमूर(दि.7ऑगस्ट):-भारत सरकारच्या सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयाने msme अंतर्गत विविध योजना सुरू केल्या आहेत. याकरीता आपल्या व्यवसायाची उद्यम नोंदणी करण्यासाठी कुठल्याही प्रकारचे शुल्क आकारले नाहीत. मात्र चिमूर शहरातील काही आपले सरकार सेवा केंद्रात या नोंदणीसाठी तब्बल चारशे ते पाचशे रूपये मोजावे लागत आहे.
उद्यम नोंदणी वित्तीय संस्थाद्वारे मान्यताप्राप्त आहे. आणि हि मान्यता लहान व्यवसायासाठी बँक कर्ज आणि कर्ज हप्ते सुलभ करते. msmeregistrar.org या पोर्टलद्वारे ही एकल-विन्डो प्रणाली आहे. ही आनलाईन जलद आणि त्रासमुक्त उद्यम नोंदणी करते.
भारत सरकारच्या सुक्ष्म उद्योग मंत्रालयाने msme अंतर्गत विविध योजना सुरू केल्या आहेत. उद्योग मंत्रालयाने msme अंतर्गत विविध योजना सुरू केल्या आहेत. या सर्व योजनांमध्ये भारत सरकारच्या मदतीने मदत दिली जाते. याकरीता चंद्रपुर जिल्ह्यासह चिमुर परिसरातील लहान उद्योग धारक आपल्या व्यवसायाची नोंदणी करतांना दिसत आहे. ही नोंदणी पुर्णतः मोफत असली तरी चिमुर तालुक्यात या नोंदणी करीता आपले सरकार सेवा केंद्राचा नावावर सुरू केलेल्या संगणक कॅफेमध्ये चारशे ते पाचशे रूपये घेत असल्याची चर्चा आहे.
लहान व्यवसायाकडुन होणाऱ्या लुटीची सत्यता पडताळणी करण्याच्या उद्देशाने चिमुर येथील नेहरू चौकात असलेल्या श्री. कन्यका नागरी सहकारी बँकेला लागुन असलेल्या बारेकर ऑनलाईन सव्हिसेस मध्ये सुरू असलेल्या आपले सराकर सेवा केंद्रात चिमुर येथील साप्ताहिक पुरोगामी संदेशची उद्यम नोंदणी केली, नोंदणी केल्यानंतर सेवा केंद्राचे मालकाने चारशे रूपये मागीतले. या संदर्भात विचारणा केली असता सेवा केंद्र संचालकांनी आम्ही इतरांकडुन पाचशे ते सहाशे रूपये घेतो आपण पत्रकार असल्यामुळे चारशे रूपये घेत आहो असे सांगीतले. आपण जास्तीचे पैसे घेत आहात असे म्हटल्यावर सुद्धा आपणास जे करायचे ते करा पण आम्ही चारशे रूपये पेक्षा कमी पैसे घेणार नाही अशी अरेरावीच्या भाषेत उत्तर दिले.
या संदर्भात जिल्हाधिकारी चंद्रपुर यांचे मार्फतीने भारत सरकारच्या सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयाकडे तक्रार करण्यात येत आहे. या सेवा केंद्रात सामान्य नागरीकांचे विविध शासकिय दस्ताऐवज बनविण्याचे काम सुरू असून यात अवाजवी शुल्क आकारून पक्षकारांची लूट सुरू आहे. दंडाधिकारी म्हणुन उपविभागीय अधिकारी चिमुर व पोलिस प्रशासनाने चौकशी करावी अशी मागणी साप्ताहिक पुरोगामी संदेश चे संपादक सुरेश डांगे ने केली आहे.
