[शाळा व्यवस्थापन समिती व गावकऱ्यांच्या वतीने निरोप समारंभ..!]
सिद्धार्थ दिवेकर(जिल्हा प्रतिनिधी,यवतमाळ)मो:-9823995466
उमरखेड (दि. 6 ऑगस्ट):-पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हरदडा येथे तब्बल दहा वर्षे उत्कृष्ट ज्ञानदानाचे कार्य करून आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटीवणाऱ्या येथील शाळेच्या शिक्षिका ज्योतीताई चिकणे यांची येथून नुकतीच बदली झाली असून त्यानिमित्ताने त्यांच्या निरोप समारंभाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून हैदराबाद येथील प्रणिताताई कांबळे या उपस्थित होत्या सर्वप्रथम महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली.
यावेळी हैदराबाद येथील सामाजिक कार्यकर्त्या प्रणिताताई कांबळे यांनी आपले विचार व्यक्त करीत ज्ञानदाना एवढे पवित्र कार्य दुसरे कोणतेही नाही आणि जो हे कार्य प्रामाणिकपणे पार पाडतो त्याच्या एवढे पुण्य कर्म दुसरे कोणतेही नसल्याचे मत त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केले.
शिक्षिका ज्योतीताई चिकणे यांच्या निरोप समारंभाच्या आयोजित कार्यक्रमाला सरपंच वैशालीताई पायगन, विनोद गुद्दलवाड उपसरपंच तंटामुक्ती अध्यक्ष श्रीरंग पायगन सुनिता दवणे ग्रामपंचायत सदस्य शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष व सर्व सदस्य जवरे सर मुख्याध्यापक व सर्व शिक्षक यांच्यासहित बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होते.




