Home महाराष्ट्र उमरखेड येथे वाद मिटवणाऱ्या पत्रकारालाच मारहाण

उमरखेड येथे वाद मिटवणाऱ्या पत्रकारालाच मारहाण

97

✒️प्रतिनिधी उमरखेड(सिद्धार्थ दिवेकर)

उमरखेड (दि. 2 अगस्ट):-उमरखेड येथील दुय्यम निबंधक कार्यालय यांच्यासमोर शेती खरेदी विक्री संदर्भात दोन व्यक्तींमध्ये वाद होत असताना तेथे उपस्थित उमरखेड वार्ता पुरोगामी संदेश डिजिटल न्यूज मीडिया दैनिक प्रबुद्ध परिवार चे जिल्हा प्रतिनिधी / पत्रकार तथा शहराध्यक्ष भीम टायगर सेना सामाजिक संघटना सिध्दार्थ दिवेकर यांना आरोपी शेख नहिद शेख रहीम अं वय 22 वर्ष याने विनाकारण डोक्यावर थापड बुक्क्यांनी मारहाण केली.

सविस्तर वृत्ती अशी आहे की, दिनांक एक ऑगस्ट 2023 रोजी सकाळी 11: 30 वाजता पत्रकार सिद्धार्थ दिवेकर हे शहीद भगतसिंग शाळा क्रमांक दोन येथे मुलीला भेटण्याकरिता जात असताना दुय्यम निबंधक कार्यालयासमोर विजय आठवले व अभिजीत दिवेकर यांच्यामध्ये बोलाबाची चा वाद सुरू झाला.यामध्ये अड करा दोन्ही पार्टी ही बौद्ध समाजाचे असल्यामुळे

हा वाद विकोपाला जाऊ नये म्हणून सिद्धार्थ दिवेकर यांनी वाद मिटवण्याचा प्रयत्न केला.पण शेख नहिद शेख रहीम याने मध्याशी करणारे पत्रकार यांनाच विनाकारण डोक्यावर थापड बुक्क्यांनी मारहाण करत शिवीगाळ करून जीव मारण्याची धमकी दिली. व आरोपीकडून माझ्या जीवितास धोका आहे त्याच्यावर योग्य कारवाई करावी.असा जबानी रिपोर्ट पोलीस स्टेशनला नोंद केला आहे. उमरखेड पोलीस स्टेशन ठाणेदार साहेब यांनी एन सी आर केला आहे एफ आय आर सिद्धार्थ दिवेकर यांचा मेडिकल करण्यात आला पत्रकाराला मारहाण केली पत्रकार सुरक्षा कायदा अनुसार कारवाई करण्यात यावे तत्काळ कारवाई करण्यात यावेआरोपी शेख नहिद शेख रहीम यांच्या विरुध्द कलम 323,504,506 नुसार गुन्हा नोंद केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here