दोन्ही जि.प.शाळेच्या परिसरात केले वृक्षारोपण
रोशन मदनकर(उप संपादक)
ब्रम्हपुरी(दि.2ऑगस्ट):-चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रम्हपुरी विभागात मागील 7 वर्षांपासून विविध सामाजिक उपक्रम राबवीत असलेला “युवा समाजसेवक, तथा न्यू लाईफ बहूउद्देशिय संस्था, ब्रम्हपुरी” ह्या सामाजिक संस्थेचे संस्थापक उदयकुमार सुरेश पगाडे यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त दि. 01/08/2023 रोजी मंगळवारला ब्रम्हपुरी शहरानजिकच्या खरबी व माहेर ह्या गावातील दोन्ही जिल्हा परिषद प्राथमिक शाळांना, संस्थेच्या सर्व सदस्यांसोबत भेटी दिल्या. तेथील सर्व शालेय विद्यार्थ्यांशी प्रेमळ हितगुज साधून सर्वांना नोटबूक, पेन, पेन्सिल, रबर, शार्पनर इत्यादी शालेय वस्तूंचा वाटप करण्यात आला. आणि दोन्ही शाळेच्या परिसरात वृक्षारोपण करून वाढदिवस साजरा केला.
ह्यावेळी, खरबी- माहेर गावचे सरपंच श्री.नितेश राऊत, उपसरपंच श्री.समीर सोनडवले, संस्थेच्या अध्यक्षा कु.पूनम कुथे, कोषाध्यक्ष श्री.भूषण आंबोरकर, सदस्य प्रशांत खोब्रागडे, सम्यक रामटेके, तसेच जि.शाळा खरबी येथील मुख्याध्यापिका सौ.वंदना पसारे, शिक्षिका सौ.आचल राऊत आणि जि.प.शाळा.माहेर येथील मुख्याध्यापक श्री.दिघोरे सर, शिक्षिका सौ.अनिता पिंपळकर आदी व्यक्ती उपस्थित होते.
(संस्थापक :- न्यू लाईफ बहूउद्देशिय संस्था, ब्रम्हपुरी)
