सचिन सरतापे(प्रतिनिधी म्हसवड)मो:-9075686100
म्हसवड(दि.1ऑगस्ट):- महात्मा जोतिबा फुले यांच्याविषयीं वादग्रस्त विधान करणाऱ्या संभाजी भिडे उर्फ मनोहर कुलकर्णी वर देशद्रोहाचा गुन्हा नोंद करावा या मागणीसाठी म्हसवड शहरात महात्मा फुले प्रेमींनी निषेध मोर्चा काढला व त्याच्या विरोधात प्रचंड घोषणाबाजी करण्यात आली यावेळी महात्मा फुले चौकात असलेल्या महात्मा फुले यांच्या पुतळ्याला फुले प्रेमींकडून दुग्धाभिषेक करण्यात आला.
संभाजी भिडे उर्फ मनोहर कुलकर्णी हे शिवप्रतिष्ठान नावाची संघटना चालवतात त्यांनी अमरावतीमध्ये महात्मा ज्योतिराव फुले यांचे विषयी अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन वादग्रस्त वक्तव्य केले आहे त्या विधानाच्या वक्तव्याचे पुरावे समाज माध्यमावर उपलब्ध आहेत महात्मा ज्योतिराव फुले सारख्या महापुरुषाच्या बद्दल या मनोहर कुलकर्णीने जे काही वादग्रस्त विधान केले आहे त्याचा फुले प्रेमी तीव्र शब्दात निषेध करत आहेत.
महात्मा फुले यांच्या पुतळ्यास दुग्धाभिषेक घातल्यानंतर हजारो फुले प्रेमी निषेध मोर्चा सामील झाले सदर मोर्चा महात्मा फुले चौकातून बाबासाहेब आंबेडकर चौक (एसटी स्टँड चौक) येथे पोहोचल्यानंतर रास्ता रोको करण्यात आला त्यावेळेला प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती यावेळी मनोहर कुलकर्णी याच्या विरोधात फुले प्रेमींनी तीव्र निषेध व्यक्त करत प्रचंड घोषणाबाजी केली.
यावेळी माजी नगराध्यक्ष नितीन दोशी,माजी नगराध्यक्ष डॉक्टर वसंत मासाळ, शंकर शेठ वीरकर, वंचित बहुजन आघाडी पुणे शहर पदाधिकारी वाल्मीक सरतापे, सामाजिक कार्यकर्ते आजिनाथ केवटे, धर्मराज लोखंडे, बबन आबदागिरे आदी फुले प्रेमींनी आपल्या भाषणातून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली या सर्वांनी अशा वाचाळ वीराला ग्रह खात्याने दुर्लक्ष केले नाही पाहिजे आणि त्याच्यावरती देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा अशी जोरदार मागणी केली जोपर्यंत मनोहर भिडे उर्फ कुलकर्णी सारख्याला ठेचले जाणार नाही तोपर्यंत महापुरुषांचा अपमान हा होतच राहणार हा अपमान थांबवण्यासाठी भिडे सारख्यांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल झालाच पाहिजे अशी मागणी फुले प्रेमींनी केली.
यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात प्रचंड वाहतूक कोंडी झाली पोलीस निरीक्षक भुजबळ आणि फुले प्रेमींच्यात शाब्दिक वाद झाला यावेळी संतप्त फुले प्रेमींनी मनोहर कुलकर्णीच्या प्रतिमेस जोड्याने मारहाण केली प्रचंड घोषणाबाजीने परिसर दणाणून गेला मनोहर कुलकर्णी ळा अटक झालीच पाहिजे अशी मागणी हजारो फुले प्रेमिकडून कडून होत होती यात राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लक्ष घालून मनोहर कुलकर्णीवर देशद्रोहाचा गुन्हा नोंद करून अटक करावी अशी मागणी फुले प्रेमींनी केली.यांनंतर म्हसवड पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भुजबळ यांना निवेदन देण्यात आल्यानंतर निषेध मोर्चा संपविण्यात आला.




