बाळासाहेब ढोले(पुसद प्रतिनिधी)
पुसद(दि.1ऑगस्ट):-छत्रपती शिवराय, फुले ,शाहू ,आंबेडकर तथा तमाम महापुरुषांच्या विचारावर चालणाऱ्या महारास्ट्रासह देशामध्ये दिवसेंदिवस आदिवासी, भटके विमुक्त, मातंग ,बौद्ध ,मुस्लिम, अल्पसंख्यांकावर सडक्या मनोवृत्तीच्या लोकांकडून मानवी अत्याचार होत आहेत. परंतु राज्यातील व देशातील सरकार या गोष्टीकडे हेतूपुरस्कर दुर्लक्ष करून समाजा समाजामध्ये माणसांमध्ये भेद निर्माण करून आपली राजकीय सत्तेची पोळी भाजण्यातच मशगुल असल्यामुळे तसेच अंगावर गेंड्याचे कातड घेऊन झोपलेल्या शासनाला जाग आणण्यासाठी वंचित बहुजन आघाडी जिल्हा शाखा यवतमाळ पश्चिम च्या वतीने पुसद येथील उपविभागीय कार्यालयावर दिनांक 2 ऑगस्ट 2023 रोजी दुपारी १२वाजता मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये भव्यजनाक्रोश मोर्चा धडकणार असून राज्यासह देशातील आदिवासी, भटके, मातंग, बौद्ध, मुस्लिम व अल्पसंख्यांकावरील दिवसेंदिवस होत असलेल्या अन्याय अत्याचाराच्या विरोधात तसेच मणिपूर येथील आदिवासी महिलांवरील अत्याचाराच्या निषेधार्थ भव्य जन आक्रोश मोर्चा चे आयोजन करण्यात आले आहे.
या मोर्चाचे नेतृत्व वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश प्रवक्ता मा. फारुख अहमद, जिल्हा प्रभारी माननीय मोहन राठोड ,जिल्हा कार्याध्यक्ष प्रमोद राऊत ,जिल्हा महासचिव डी.के.दामोधर, जिल्हा उपाध्यक्ष एस के राठोड, जिल्हा संघटक मौलाना सय्यद हुसेन, जिल्हा प्रसिद्धीप्रमुख मौलाना शेख,मदार, वंचित बहुजन आघाडी पुसद तालुका अध्यक्ष भालेराव, पुसद शहराध्यक्ष जयानंद उबाळे, राजरत्न लोखंडे, डॉ. अरुण राऊत, मधुकर सोनवणे, अजय तालीकोटे हे करणार असून या मोर्चामध्ये जिल्ह्यातील सर्व जिल्हा पदाधिकारी सर्व तालुका पदाधिकारी शहर पदाधिकारी ग्रामीण शाखेपासून सर्व कार्यकर्ते या मोर्चात हजारोच्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.
मोर्चा मधील प्रमुख मागण्या:
१) परळी येथील जरीन खान चा पोलीस कस्टडीमध्ये खून करणाऱ्या पोलिसांवर सदोष मनुष्यवधाचा 302 गुन्हा दाखल करून त्यांना तात्काळ सेवेतून कायम बडतर्फ करावे
२) जरीन खानच्या कुटुंबीयास शासनाकडून 50 लाखाची आर्थिक मदत व्हावी.
२) बोंढार येथील अक्षय भालेराव मृत्यूप्रकरणी दोशींना मरेपर्यंत फाशीची शिक्षा व्हावी.
३) भूम येथील फैयाज खान मृत्यू प्रकरणातील सर्व दोषींना अटक करून शिक्षा व्हावी.
४) मणिपूर येथील घटनेतील दोषींवर कठोरात कठोर कार्यवाही व्हावी.
५) गोरक्षणाच्या नावाखाली पोलिसांना हाताशी धरून वाढत असलेला उन्माद तात्काळ थांबविण्यात यावा.
यासह विविध मागण्यांकरिता वंचित बहुजन आघाडी जिल्हा शाखा यवतमाळ पश्चिम च्या वतीने मोर्चाचे आयोजन करण्यात आले तरी जिल्ह्यातील तमाम शोषित पीडित वंचित बहुजनांनी तथा मुस्लिम अल्पसंख्यांक हजारोच्या संख्येने या मोर्चास उपस्थित व्हावे असे आव्हान जिल्हा प्रसिद्धीप्रमुख यांच्या वतीने करण्यात आले आहे.