इंस्पायर करिअर अकॅडमी तर्फे आयोजित सत्कार तथा विद्यार्थ्यांना मार्गदर्शन कार्यक्रम
रोशन मदनकर(उप संपादक)
ब्रम्हपुरी(दि.29 जुलै):-शहरातील इंस्पायर करिअर अकॅडमी ही विद्यार्थ्यांच्या मार्गदर्शनासाठी नेहमीच तत्पर असते. तसेच या अकॅडमी तर्फे शहरातील व बाहेरील विद्यार्थ्यांना त्यांच्या ध्येया पर्यंत पोहचनासाठी इंस्पायर करिअर अकॅडमी कडून मोलाचे मार्गदर्शन लाभले आहे. विद्यार्थ्यांना अभ्यासाची ऊर्जा निर्माण करण्यासाठी नुकतीच पी. एस. आय. (PSI ) पदी निवड झालेले मोसम मोहूर्ले यांचे मार्गदर्शन इंस्पायर करिअर अकॅडमी कडून विद्यार्थ्यांपर्यंत पोहचवण्यात आले.
“कुठल्याही एकाच ध्येयावर लक्ष केंद्रित करा यश तुमचेच आहे” असा संदेश मा.सत्कारमूर्ती मोसम मोहूर्ले यांनी आपल्या सत्काराला उत्तर देतांना दिलं. ते आज दि.28/7/2023 रोज शुक्रावरला ‘इंस्पायर करिअर अकॅडमी’ तर्फे आयोजित सत्कार तथा विद्यार्थ्यांना मार्गदर्शन या कार्यक्रमात बोलत होते.त्यांची नुकतीच महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात येणाऱ्या परीक्षेत पी. एस. आय. (PSI) पदी निवड झाली.त्या अनुषंगाने इंस्पायर करिअर अकॅडमी येथे त्यांचा सत्कार तथा मार्गदर्शनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
नागभीड तालुक्यातील तळोधी या छोट्याश्या गावात पदवीपर्यंत शिक्षण घेऊन, अथक परिश्रम करून त्यांनी हे यश मिळवले. सात्यत,संयम व कोण काय म्हणेल? याची तमा न बाळगता सतत परिश्रम केल्याने यश मिळतेच असेही ते म्हणाले. कार्यक्रमाला संचालिका एकता गुप्ता , प्रा.प्रवीण प्रधान ,विवेक खरवडे सर तसेच विद्यार्थी- विद्यार्थीनी उपस्थित होते.




