Home महाराष्ट्र ब्रह्मपुरी तालुका दक्षता समितीच्या अध्यक्षपदी विजय जीभकाटे यांची निवड

ब्रह्मपुरी तालुका दक्षता समितीच्या अध्यक्षपदी विजय जीभकाटे यांची निवड

110

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

ब्रम्हपूरी(दि. 28 जुलै):-सार्वजनिक वितरण व्यवस्थेमार्फत वितरण करण्यात येणाऱ्या जीवनावश्यक वस्तूंवर देखरेख करण्याकरिता ब्रम्हपूरी तालुका पातळीवरील दक्षता समितीच्या अध्यक्षपदी विजय देवाजी जिभकाटे यांची निवड झालेली असून सदस्य पदी रेवती लोमेश ठाकूर, संगीता रवींद्र जेंगठे, मनीषा मोरेश्वर ढोरे, शिल्पा ज्ञानेश्वर दिवटे, शालू मेघराज राखडे, पटवारी मलोडे, रामभाऊ गोविंदा निहाटे, यशवंत मानकर, अरुण मारोती झंजाळ, नरेंद्र दुपारे इत्यादींची निवड महाराष्ट्र राज्याचे वने, सांस्कृतिक तथा मत्स्य व्यवसाय मंत्री मा.नामदार सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी केलेली असून नवनियुक्त समिती पदाधिकाऱ्यांनी मा. नामदार सुधीरभाऊ मुनगंटीवार आणि ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार प्रा. अतुलभाऊ देशकर यांचे आभार मानले.

नवनयुक्त पदाधिकाऱ्यांचे ब्रम्हपूरी विधानसभा क्षेत्राचे लोकप्रिय माजी आमदार आदरणीय प्रा अतुल भाऊ देशकर, प्राचार्य अरुण शेंडे तालुकाध्यक्ष भाजपा ब्रह्मपुरी, इंजिनियर अरविंद नंदुरकर शहराध्यक्ष भाजपा ब्रह्मपुरी शहर यांचे सह डॉ.गोकुलजी बालपांडे जिल्हा उपाध्यक्ष भाजपा चंद्रपूर, माणिक पाटील थेरकर जिल्हा सचिव भाजपा,सौ.वंदनाताई शेंडे, जिल्हा उपाध्यक्ष भाजपा महिला आघाडी चंद्रपूर, प्रा. रामलाल दोनाडकर तालुकाध्यक्ष भाजयुमो ब्रह्मपुरी,तनय देशकर जिल्हा सचिव भाजयुमो चंद्रपूर, शिलाताई गोंधोळे तालुकाध्यक्ष भाजपा महिला आघाडी, ज्ञानेश्वर दिवटे महामंत्री,प्रेमलाल धोटे तालुकाध्यक्ष भाजपा ओबीसी मोर्चा,प्रा. यशवंत आंबोरकर महामंत्री भाजयुमो ब्रह्मपुरी तालुका तथा संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती, इंजिनियर अविनाश मस्के महामंत्री भाजयुमो ब्रह्मपुरी तालुका, राजेश्वर मगरे,अनिल तिजारे चुमदेव जांभुळकर,द्यानेश्वर भोयर,उमेश घुले,धीरज पाल,सचीन ठाकरे, पिंटू भाऊ आंबोरकर इ.नीअभिनंदन करून भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here