Home चंद्रपूर यूपीएससी पूर्वतयारी प्रशिक्षणासाठी १४ ऑगस्टपर्यंत मागविले अर्ज -बार्टीतर्फे निःशुल्क अनिवासी प्रशिक्षण

यूपीएससी पूर्वतयारी प्रशिक्षणासाठी १४ ऑगस्टपर्यंत मागविले अर्ज -बार्टीतर्फे निःशुल्क अनिवासी प्रशिक्षण

140

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

चंद्रपूर(दि.25जुलै):-बार्टी संस्थेमार्फत दिल्ली येथील प्रशिक्षण संस्थेचे प्रशिक्षण शुल्क देण्यात येते. हे प्रशिक्षण अनिवासी असल्याने उमेदवारांना दिल्ली येथील निवासी व भोजनाची व्यवस्थेकरीता प्रती माह कमाल रक्कम १३ हजार रुपये विद्यावेतन देण्यात येते. विद्यावेतन करिता विद्यार्थ्यांची उपस्थिती ग्राहय धरण्यात येईल. प्रशिक्षणाच्या सुरुवातीस दिल्ली येथे जाण्याकरीता पाच हजार रुपये व प्रशिक्षण संपल्यानंतर परतीच्या प्रवासाकरीता पाच हजार रुपये प्रवास खर्च देण्यात येतो. पहिल्या महिन्यातील आर्थिक सहाय्य तीन हजार रुपये देण्यात येणार आहे.

बार्टी अर्थात डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे मार्फत दिल्ली येथील नामांकीत प्रशिक्षण संस्थांमध्ये राज्यातील अनुसुचित जातीच्या विद्यार्थ्यांसाठी संघ लोकसेवा आयोग नागरी सेवा परिक्षेसाठी निःशुल्क अनिवासी प्रशिक्षण राबविण्यात येणार आहे. या वोजनेसाठी १४ ऑगस्टपर्यंत अर्ज मागविण्यात येत आहे.

राज्यातील अनुसुचित जातीतील ३०० उमेदवारांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) पुणे मार्फत दिल्ली येथील प्रशिक्षण संस्थेमध्ये संघ लोकसेवा आयोग नागरी सेवा परिक्षेच्या पूर्वतयारी प्रशिक्षणासाठी पुरस्कृत करण्यात येणार आहे. युपीएससी परिक्षेच्या पूर्व तयारी प्रशिक्षणासाठी दिल्लीतील केंद्रासाठी अनुसुचित जातीच्या ३०० उमेदवारांची निवड करण्यात येईल.

यामध्ये ३० टक्के जागा महिलांसाठी, ४ टक्के जागा दिव्यांग व्यक्तीसाठी, ५ टक्के जागा अनुसुचित जाती अंतर्गत वंचित जातीमधील वाल्मिकी व तत्सम जाती, होलार, बेरड, मातंग, मांग, मादगी आदी समाजातील विद्यार्थ्याकरिता आरक्षित असतील. एकुण जागांच्या ५ टक्के जागा विशेष बाब म्हणुन राखीव ठेवण्यात येतील.

या योजनेसाठी उमेदवार महाराष्ट्र राज्याच्या रहिवाशी असावा. उमेदवाराकडे महाराष्ट्रातील अनुसुचित जातीचा दाखला व अधिवास असावा. उमेदवार कोणत्याही शाखेचा पदवीधर असावा, उमेदवाराचे वय संघ लोकसेवा आयोग नागरी सेवा परिक्षेच्या अटी व शर्ती नुसार असावे, संघ लोकसेवा आयोगामार्फत सन २०२४ मध्ये घेण्यात येणाऱ्या नागरी सेवा परिक्षेसाठी पात्र असावा, रुपये ८ लाखापर्यंत कौटुंबिक उत्पन्न मर्यादा असलेले उमेदवार प्रशिक्षणासाठी पात्र असतील. २७ ऑगस्ट २०२३ रोजी सामाजिक प्रवेश परिक्षा (सीईटी) आयोजीत करण्यात आली असुन इच्छुक पात्र उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी अधिकृत संकेतस्थळास भेट द्यावी असे आवाहन बार्टीचे महासंचालक सुनिल बारे यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here