सातारा-खटाव,प्रतिनिधी(नितीन राजे)मो:-9822800812
सातार(दि.24जुलै):-जिल्ह्यातील खटाव तालुक्यास वरदायनी ठरणाऱ्या जिहे कटापुरचे पाणी नेर तलाव्यात आणल्यानंतर आ. महेश शिंदे यांनी खटाव तालुक्याच्या उत्तर भागातील वंचित गावांना पाणी देण्यासाठी सर्वें करून घेऊन लिफ्ट 1-2-3 योजनेचा आराखड़ा तयार करून प्रत्यक्ष काम सूरु केले असून, हे काम प्रगती पथावर असून लवकरच वंचित गावाना जिहे कटापुरचे पाणी दिले जाईल, अशी माहिती आमदार महेश शिंदे यांचे कट्टर समर्थक युवा नेते भाजपा युवा मोर्चा सातारा जिल्हा उपाध्यक्ष धीरज जाधव यांनी दिली..
सध्या जिहे कटापुर चे पाणी नेर तलावात आले असले तरी खटाव उत्तरची मोळ, डिस्कळ, नवलेवाडी , राजापुर वेटने रणसिंवाडी निढळसह काही गावे त्या पासून वंचित राहिली होती.आ. महेश शिंदे यांच्या अथक प्रयासातून पूर्णत्वास येत असलेल्या या लिफ्ट 1-2-3 च्या माध्यमातून नेर तलाव्याच्या वरचा सर्व भाग ओलिताखाली येणार असून, खटाव उत्तर आता पाणीदार होणार आहे.
संपूर्ण खटाव तालुका ओलिताखाली येण्याच स्वप्न येथील जनता वर्षानुवर्ष पाहत आली होती परंतु या अगोदरच्या काही लोकप्रतिनिधिमुळे ते स्वप्न पूर्ण होत नव्हते, परंतु येथील स्थानिक जनतेच , शेतकऱ्याच स्वप्न पूर्ण करण्याच काम कार्यसम्राट आ. महेश शिंदे हे करत आहेत. लिफ्ट 1- 2 च्या पाहणी दौऱ्या नंतर युवा नेते भाजपा युवा मोर्चा सातारा जिल्हा उपाध्यक्ष धीरज जाधव यांनी ही माहिती दिली.




