अनिल साळवे(गंगाखेड प्रतिनिधी)
गंगाखेड(दि.23जुलै):-पाणी पुरवठा अधिकारी नगर परिषद गंगाखेड यांचा बेजबाबदार कारभारा मुळे गंगाखेड शहरास पाणी पुरवठा होत नसल्याने दिसून येत आहे. गंगाखेड शहरास मासोळी धरणातून पाणी पुरवठा करण्यात येतो असून या शहराची लोकसंख्या अंदाजे पन्नास ते साठ हजार जवळपास असून पाणी पुरवठा विभाग कडून पाणी पुरवठा करण्यासाठी केवळ एक मोटार पंपचा वापरकरत करत असल्या मुळे सर्व भार एका मोटार पंप वर पडत असल्या मुळे मोटार पंप बंद पडत असतो.
परंतु पाणी पुरवठा अधिकारी नगर परिषद गंगाखेड यांच्या निष्काळजी मुळे शहरास वेळेवर पाणी पुरवठा होत नसल्याने नागरिकांना पाणी साठी भटकंती करावी लागत आहे.शहरातील पाण्यासाठी नगर परिषद गंगाखेड यांनी पर्याय व्यवस्था उपलब्ध नसल्याने नागरिकांना पाणी टंचाई होत आहे.सतत पाऊस पडत असताना मात्र गंगाखेड शहरातील जनतेला पाणी पासून वंचित ठेवण्याचे काम पाणी पुरवठा अधिकारी नगर परिषद गंगाखेड यंच्या बेजबादार पणा मुळे होत आहे.




