परिसराच्या विविध विषयावर चर्चा
सिध्दार्थ दिवेकर(जिल्हा प्रतिनिधी,यवतमाळ)मो:-9823995466
बिटरगाव(दि.16जुलै):- उमरखेड तालुक्यातील बिटरगाव पोलीस स्टेशन येथे नव्याने रुजू झालेल्या प्रथम महिला ठाणेदार सुजाता बनसोड मॅडम हे कार्यरत झाल्यापासून अनेक अवैध रित्या चालणाऱ्या रेती वाहतूक तसेच अवैध गुटखा विक्री वाहतूक करणाऱ्यांवर दबंग गिरीने कारवाई सुरू केली आहे.
पुढील काळातही अशाच प्रकारे कार्यवाही करणार अशी चर्चा ढाणकी/बिटरगाव पोलीस स्टेशन परिसरामध्ये सुरू आहे.
प्रथम महिला कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून त्यांची उमरखेड पोलीस स्टेशन येथून काही दिवसापूर्वीच प्रमोशन होऊन बिटरगाव येथील कार्यभार सांभाळायला सुरुवात केली आहे.
या पोलीस स्टेशनला प्रथमच महिला ठाणदार म्हणून व त्यांची दबंग कारवाई पाहून उमरखेड तालुक्यातील हरदडा गावातील दानशूर, समाजाच्या अडीअडचणीला धावून येणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या प्रणिता कांबळे यांनी सदिच्छा भेट घेऊन शाल व पुष्पगुच्छ देऊन ठाणेदार बनसोड मॅडम यांचे स्वागत केले.
आणि परिसरातील चालू घडामोडी आणि शाळेतील मुलींना रोड रोमियो कडून होणारा त्रास याबद्दल आणि असे अनेक विषयावर सविस्तर चर्चा करून त्यांना पुढील कार्यास मंगलमय शुभेच्छा दिल्या.
यावेळी प्रणिता कांबळे यांच्यासोबत अनेक महिला उपस्थित होत्या.
