Home महाराष्ट्र पारमिता बुद्धविहारात वर्षावासाचे आयोजन

पारमिता बुद्धविहारात वर्षावासाचे आयोजन

97

✒️बाळासाहेब ढोले(पुसद प्रतिनिधी)

पुसद(दि.4जुलै):- दि बुध्दिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखा यवतमाळ यांच्या अंतर्गत तालुका शाखा पुसद यांच्या वतीने दि. ३जुन२०२३ आषाढी पोर्णिमा पासुन ते अश्विन पोर्णिमा पर्यंत दररोज सायंकाळी ८ ते १० या दरम्यान डाॅ. बाबासाहेब आंबेडकर लिखित “भगवान बुध्द आणि त्यांचा धम्म” या धम्म ग्रंथाचे वाचन करण्याच्या कार्यक्रमाचे पारमिता बुध्दविहार महाविरनगर येथे आयोजन करण्यात आले आहे.

या कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हा शाखेचे प्रचार व पर्यटन सचिव तथा बौध्दाचार्य भगवान बरडे यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी भारतीय बौद्ध महासभेचे तालुकाध्यक्ष तथा समता सैनिक दलाचे मेजर भारत कांबळे, महिला वार्ड शाखा महाविरनगर अध्यक्षा शांताबाई मंडाले,तसेच आदी मान्यवर उपस्थित होते.

बौध्दाचार्य भगवान बरडे व भगवान खंदारे ग्रंथ वाचक म्हणून आषाढी पोर्णिमा ते अश्विन पोर्णिमा तीन महिने अखंडपणे जबाबदारी पार पाडणार आहेत.जिल्हा शाखेचे प्रचार व पर्यटन जिल्हा सचिव तथा बौद्धाचार्य भगवान बरडे यांनी समाज बांधवांना आवाहन केले की जास्तीत जास्त संख्येने या कार्यक्रमास उपस्थित राहावे.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विजयाताई कांबळे यांनी केले तर आभार ज्योतीताई कांबळे यांनी मानले.या कार्यक्रमास भारतीय बौध्द महासभेचे व समता सैनिक दलाचे पदाधिकारी, पारमिता महिला मंडळाच्या पदाधिकारी,आणि समाज बाधंव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here