Home यवतमाळ तेरा वर्ष कारखाना चालवून बंद पाडला? ते आपला जीन प्रेस काय चालवणार?...

तेरा वर्ष कारखाना चालवून बंद पाडला? ते आपला जीन प्रेस काय चालवणार? चातारी- येथील सभेत रामदेवसरकारचे वक्तव्य

167

 

✒️ सिध्दार्थ दिवेकर (जिल्हा प्रतिनिधी,यवतमाळ) मो.9823995466

उमरखेड (दि.17 जून) येथील 18 जून 2023 रोजी आपला जिन प्रेसची निवडणूक असून या निवडणुकीत राम देवसरकर पाटील यांनी महाविकास आघाडी सहकारी पॅनल च्या 16 उमेदवाराच्या प्रचारादरम्यान चातारी येथे भव्य सभा झाली.

या सभेत राम देवसरकर यांनी सत्यशोधक पॅनलच्या नेत्यांचा खडसुन समाचार घेतला.

यावेळी तेरा वर्षे कारखाना चालवण्याऱ्यांनी वसंत सहकारी साखर कारखाना बंद पाडला ते आपला जिन प्रेस काय चालविणार आपला जिन प्रेस ही मालमत्ता शेतकऱ्यांची आहे.

असे त्यांनी यावेळी म्हटले यावेळी उद्योगावर बोलताना ते म्हणाले की, प्रायव्हेट रित्या एमआयडीसीचे निर्माण करून हळद प्रक्रिया उद्योग निर्माण करता येईल, रेशीम उद्योग निर्माण करता येईल असे त्यांनी म्हटले यावेळी त्यांनी कारखान्याच्या भ्रष्टाचाराचा पाढाच वाचला.

विजयराव माने यांच्यावर बोलताना गडूळ झालेल्या राजकारणात तुरटी फिरविण्याकरिता आले पण स्वतःच गढूळ पाण्यात जाऊन बसल..! आता तुरटी कशी फिरवणार असा त्यांनी प्रश्न उपस्थित केला.

यावेळी माजी आमदार नागेश पाटील आष्टीकर, तातू भाऊ देशमुख,नंदकिशोर अग्रवाल, बाळासाहेब चंद्र पाटील, प्रवीण शिंदे जिल्हाप्रमुख शिवसेना यवतमाळ,सौ निर्मला विनकरे,सौ रक्षा माने यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

आपले मनोगत व्यक्त करताना महाविकास आघाडीच्या उमेदवारांना मतदान करण्याची विनंती केली.

यावेळी मोठ्या संख्येने हजारो जनसमुदाय उपस्थित होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here