Home यवतमाळ युनिव्हर्सल इंग्लिश मीडियम स्कूल चा अथर्व कदम एस. एस. सी परीक्षेत जिल्ह्यातून...

युनिव्हर्सल इंग्लिश मीडियम स्कूल चा अथर्व कदम एस. एस. सी परीक्षेत जिल्ह्यातून चौथा तर तालुक्यातून पहिला

101

 

✒️ सिध्दार्थ दिवेकर (जिल्हा प्रतिनिधी, यवतमाळ) मो.9823995466

उमरखेड :- (6 जून) नुकत्याच घोषित झालेल्या एस. एस. सी. परीक्षेत स्थानिक युनिव्हर्सल शाळेने घवघवीत यश संपादन करीत प्रत्येक वर्षी प्रमाणे या वर्षी सुद्धा 100% निकाल दिला असून, शाळेचा अथर्व मनोज कदम याने 97.40% गुण मिळवून जिल्ह्यातून चौथा क्रमांक तर तालुक्यातून पहिला क्रमांक प्राप्त केला आहे.

तर याच शाळेची विद्यार्थ्यांनी कु. श्वेता ज्ञानेश्वर वानखेडे ही 96.40% गुण मिळवून जिल्ह्यातून सहावी तर तालुक्यातून दुसरी आली आहे,तर कुमारी मिसबाह नैश खान हिने 96% गुण मिळवून जिल्ह्यातून आठवी व तालुक्यातुन चौथी आली आहे. युनिव्हर्सल ई. मि. स्कुलचे सर्वच विद्यार्थी उत्तम गुण घेऊनउत्तीर्ण झाले व शाळेच्या यशात भर घातली.

एकूण 75 विद्यार्थ्यांपैकी 21 विद्यार्थ्यांनी 90% पेक्षा अधिक गुण मिळविले आहेत तर 61 विद्यार्थी विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण झाले आहेत व सर्वच विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले हे विशेष.
युनिव्हर्सल इंग्लिश मीडियम स्कूल ही मागील 18 वर्षापासून सतत 100% निकाल देणारी उमरखेड तालुक्यांतील एकमेव इंग्रजी माध्यमाची शाळा आहे.
प्राविण्य प्राप्त विद्यार्थ्यांचे, संस्थेचे अध्यक्ष एॅड. संतोष जैन, उपाध्यक्ष कमलजी माहेश्वरी, सचिव भगवानजी अग्रवाल, व संस्थेचे सर्व विश्वस्थ तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. मनीषा फुलेवार, पर्यवेक्षिका सौ. प्रीती बजाज व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले व पुढील शिक्षणासाठी शुभेच्छा दिल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here