इसलामपूर दि(प्रतिनिधी)//इकबाल पीरज़ादे
माहूर हे तीर्थक्षेत्राचे शहर आहे.माहूर शहरात मी सिमेंट काँक्रिट चे रस्ते केले,तुम्ही त्या रस्त्याचा बाजूला १० हजार झाडे लावा,शहरातील प्रत्येकानी आपल्या घरी झाडे लावल्यास हा परिसर फुलेल.विदर्भ – मराठवाड्याची सर्वात सुंदर नगर पालिका करा मी शक्य ते मदत करेन असे असे आश्वासन ना.नितीन गडकरी यांनी दिले.
ना.नितीन गडकरी आज शनिवार रोजी विकास कामाच्या भूमिपूजना साठी माहूर दौऱ्यावर आले होते.या वेळी माहूर चे प्रथम नागरिक नगराध्यक्ष फिरोज दोसानी यांनी नितीन गडकरी यांच्या शहरावशिया तर्फे पुणेरी पेशवाई पगडी,भेट वस्तू देऊन यथोचित नागरिक सत्कार केला. व माहूर रेल्वे बोडग्रेज लाईन,रेणुका देवी ते दत्तशिखर आनुसया पर्यंत रोप वे,नांदेड च्या गुरुता गद्दी च्या धर्तीवर माहूर ला प्रशस्त भक्त निवास,पार्किंग साठी ५ एकर जागा, व विविध विकास कामासाठी ५० कोटींचा निधी द्यावा असे ५ विषयाचे स्वतंत्र निवेदन गडकरी यांना दिले.त्या नंतर ना.गडकरी यांनी माहूर विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही,तुम्ही प्रस्ताव बनवून राज्य सरकार व भारत सरकार कडे पाठवा, माहूर नगरपंचायत ला विदर्भ मराठवाड्यातील सुंदर नगर पंचायत बनविण्यासाठी निधी मी मिळवून देईल अशी ग्वाही दिली. त्यामुळे येत्या काळात माहूर शहराच्या विविध समस्या नामदार नितीन गडकरी यांच्या सहाय्याने निकाली निघणार असून तीर्थक्षेत्र माहूरला साजेशे रूप ही मिळेल.यात शंका नाही.विशेष म्हणजे ना.गडकरी यांनी नगराध्यक्ष फिरोज दोसानी यांना उद्देशून दोन वेळा माहूर शहराच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने सूचना केल्याने नक्कीच पुढील काळात माहूर चे रुपडे बदलणार आहे.
