चिमूर प्रतिनिधी
चिमूर तालुक्यामधे अवैध रेती उत्खन्न जोरात चालू आहे तक्रार दाखल करून सुद्धा कुठली ही कारवाही होत नाही हे दुर्दैव आहे त्यामुळे गावकऱ्यांनी आज प्रत्यक्ष जाऊन अवैध रेती उपासा करणारा ट्रकटर कोटगाव वासियांनी पकडला मागील तीन महिन्यापासून कोटगाव येथे उत्खन्न चालू होते ग्राम पंचायत सदस्य उपक्षम रामटेके यांनी तहसील कार्यालयात तक्रार दाखल करून सुद्धा कुठलीही कार्यवाही होत नव्हती, आपले कुणीच काही वाकडे करू शकत नाही असे अवैध उपासा करनाऱ्यांना वाटत होते परंतु ग्राम पंचायत सदस्य उपक्षम रामटेके व गावातील नागरिक यांनी प्रत्यक्ष अवैध उत्खन्न करणारा ट्रकटर पकडला नंतर तलाठी तोडसे यांना फोन करण्यात आला त्यांनी कुठलाही विलंब न करता प्रत्यक्ष आपल्या टीम सबोत घटना स्थळी आले पंचनामा करून ट्रकटर तहसील कार्यालय येथे जमा करण्यात आला




