Home महाराष्ट्र गौतम बुद्ध यांनी मानवा मानवात प्रेमाचे नाते निर्माण केले-जयसिंग वाघ

गौतम बुद्ध यांनी मानवा मानवात प्रेमाचे नाते निर्माण केले-जयसिंग वाघ

74

जळगाव :- अनादिकाळा पासून जगात टोळी युद्ध होत आले , पुढं राजेशाही आली तेंव्हा युद्व करणे राजधर्म ठरला यात मानवी हत्या मोठ्या प्रमाणात होत गेली , मानवी जीवन असुरक्षित झाले, अश्या सामाजिक, राजकीय अवस्थेत सिद्धार्थ गौतम बुद्ध यांनी शांतता व अहिंसा हे तत्व सांगून युद्ध रोखले व मानवा मानवांत प्रेमाचे नाते निर्माण करुन मानवी जीवन सूखकर केले. असे विचार प्रसिद्ध साहित्तीक तथा विचारवंत जयसिंग वाघ यांनी कानळदा येथील बुद्ध जयंती निमित्त आयोजित जाहिर सभेत व्यक्त केले .
जयसिंग वाघ यांनी अत्यंत अभ्यासपूर्ण भाषणात सांगितले की , गौतम बुद्ध यांनी केवळ शांतता , अहिंसा हीच तेत्वे सांगितली नाही तर समता,स्वातंत्र, बंधुता, न्याय, स्त्री पुरुष समानता या तत्वाची मुहूर्तमेढ रोवून सर्व जगाची विचार करण्याची दिशाच बदलून टाकली. गौतम बुद्ध यांनी दिलेले पंचशील बौद्ध धर्मियांची प्रार्थना बनली की जी स्वतः स्वतःला बदलविन्याचा संकल्प करते .ही प्रार्थना म्हणजे मी हिंसा, चोरी, व्यभिचार करणार नाही,खोटे बोलणार नाही व दारू पीणार नाही असे आपल्या कडून वदवून घेते , या संकल्पने प्रमाणे आपण जगलो तर आपण, आपले कुटुंब सुखानेच जगणार एवढी ताकत त्यात आहे असेही जयसिंग वाघ यांनी स्पष्ट केले .
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच पुंडलिक सपकाळे होते त्यांनी गौतम बुद्ध व बाबासाहेब आंबेडकर यांनी दाखवुन दिलेल्या मार्गाने चालणे हे प्रत्येक माणसाचे कर्तव्य असल्याचे सांगुन या महामानवांचे कार्य अतुलनीय आहे, त्यांचे विचार व कार्य हे भविष्यात सुद्धा दीपस्तंभ प्रमाणे मार्गदर्शन करत राहतील असे विचार व्यक्त केले .
बाबूराव वाघ यांनी त्रिशरण व पंचशील हे मानवी जीवनात खूप महत्वाचे असून प्रत्येकाने त्याचे पालन करावे असे आवाहन केले . त्यांनी बुद्ध जीवनातील विविध प्रसंग विस्तारपूर्वक मांडून त्याचे अर्थ सांगितले , बुद्ध विचार हे केवळ विचार नसून ते मानवी जीवनाचे तत्त्व आहे असेही त्यांनी सांगितले.
प्रास्ताविक आ. बा. सपकाळे यांनी तर सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन जगदीश सपकाळे यांनी केले . सुरवातीस भगवान गौतम बुद्ध , डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे पूजन मान्यवारांच्या हस्ते करण्यात आले , त्या नंतर सामूहिक बुद्ध वंदना घेण्यात आली शेवटी खीर दान करण्यात आले , सभेस स्त्री पुरुष मोठ्या संखेने हजर होते .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here