रोशन मदनकर (उप संपादक) मो. 88886 28986
ब्रम्हपुरी (दि. 2 मे ):-
राष्ट्रीय मानव अधिकार संघटना नवी दिल्ली चे राष्ट्रीय संचालक अध्यक्ष श्री गणेश डवरी यांनी चंद्रपूर जिल्हा शाखेवर सारंग दाभेकर यांची जिल्हा अध्यक्ष म्हणून निवड केल्याबद्दल महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून अखिल भारतीय श्रीगुरुदेव सेवामंडळ गुरुकुंज मोझरी संचालित श्रीगुरुदेव आत्मानुसंधान भू वैकुंठ अड्याळ टेकडी चे अध्यक्ष मोरेश्वर उईके, बजरंग दल ब्रम्हपुरी व विश्व हिंदू परिषद ब्राम्हपुरी चे शांतनू भांडारकर व भारतीय क्रांतिकारी संघटने चे संस्थापक अध्यक्ष डार्वीन कोब्रा यांनी गुरुपद गुंफा अड्याळ टेकडी येथे सारंग उर्फ पुरुषोत्तम भाऊराव दाभेकर यांचा शाल श्रीफळ व पुष्प गुच्छ देऊन सत्कार करून त्यांचेवर अभिनंदनाचा वर्षाव केला. मागील तीस वर्षापासून सारंग दाभेकर हे सामाजिक कार्यात कार्यरत असून गुरुदेव सेवामंडळात सक्रिय आहेत. आई वडिलांचा समाजकार्याचा वारसा ते आपल्या समाजिक कार्यातून सिद्ध करीत आहेत. परम पूज्य तुकाराम दादा गीताचार्य यांचे शेवटच्या पाच वर्षातील प्रत्यक्ष सहवासात ग्रामसभेच्या आंदोलनात सारंग दाभेकर यांची भूमिका महत्वाची होती. श्रीगुरुदेव आत्मानुसंधान भू वैकुंठ अड्याळ टेकडी येथे सन 2003 पासून कुटुंबासह पाच वर्ष वास्तव्याने राहून नंतर ते सन 2007 पासून तन मन धनाने सर्वस्वी समर्पित झाले. सध्या ग्रामगीता तत्त्वज्ञान सक्रिय दर्शन मंदिर पंढरपूर येथील भू वैकुंठ समितीमध्ये सहसचिव, बालाजी महाराज बहुुद्देशिय व्यापारी मंडळ चिमूरचे सचिव, श्री विश्वकर्मा औद्योगिक सहकारी संस्था चिमूर चे अध्यक्ष, पतंजली योग समिती चिमूर चे तालुका सहप्रभारी, लोहार व तस्सम जाती समाज संघटनेचे तालुका अध्यक्ष असून. चिमूर तालुका शिवसेना प्रमुख, महात्मा गांधी तंटामुक्त गाव समिती चिमूर चे अध्यक्ष, वनहक्क समिती चिमूर चे सचिव, भारत स्वाभिमान न्यास चिमूरचे तालुका प्रभारी, वैदर्भीय लोहार, गाडी लोहार व तत्सम जाती महासंघ नागपूर चे युवाध्यक्ष अशा विविध पदावर यशस्वी कार्य केली आहे. सत्य, इमानदारी, निर्व्यसनी व निस्वार्थ पणे समाजातील कामांना धावून जाणारा समाज कार्यकर्ता म्हणून त्यांची जिल्ह्यात ओळख आहे. प्रशासनाचा अनुभव त्यांना असून कोणत्याही नेत्याकडे न जाता अधिकाऱ्यांकडून नम्रतेने काम करून घेण्याचे कौशल्य त्यांच्यात असून प्रसंगी संविधानिक अधिकाराचा वापर करून संघर्ष आंदोलन करून काम करण्याचा त्यांचा हातखंड आहे. तेव्हा अशा तडफदार समाज सेवक गुरुदेव भक्त सारंग दाभेकर यांची राष्ट्रीय मानव अधिकार संघटना नवी दिल्ली च्या चंद्रपूर जिल्हा शाखेवर जिल्हा अध्यक्ष म्हणून निवड झाल्याने सर्वत्र त्यांचे अभिनंदन होत आहे. त्यांच्या पुढील समाजिक कार्याला उपस्थितांकडून शुभेच्छा देण्यात आल्या. सत्कार प्रसंगी त्यांची अर्धांगिनी निशा दाभेकर, जनाबाई जांभुळे, ज्योती शिरपूरकर, कैलास भोयर, दयारामजी कन्नाके, चेतन कवाडकर, सूरज भाऊ सयाम, आसुसिंग राजपूत, कृष्णा खरवडे, देवा गुरु, वैभव कुसनाके, विकी मेश्राम, सुरेश मडावी इत्यादी मान्यवर उपस्थित होते.




