अनिल साळवे,गंगाखेड (प्रतिनिधी )
गंगाखेड -शहरातिल जेष्ठ पत्रकार, संपादक व गंगाखेड तालुका ग्रामीण तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष मोसीन खान यांनी सुरू केलेल्या ‘जनशन महाराष्ट्र ‘ या वर्तमानपत्राचा प्रथम अंक प्रकाशन सोहळा गंगाखेड विधानसभेचे लोकप्रिय आ.डॉ.रत्नाकर गुट्टे व पोलीस निरीक्षक वसुंधरा बोरगावकर,यांच्या शुभहस्ते अतिशय थाटामाटात संपन्न झाला.
सामाजिक बांधिलकी जोपासून पत्रकारांनी काम करायला हवं. कारण, पत्रकारिता समाजाचा आरसा आहे. म्हणून दुर्लक्षित प्रश्नांकडे डोळसपणे बघा. त्यासाठी प्रामाणिक व पारदर्शक राहा, असा सल्ला आ.डॉ.गुट्टे साहेब यांनी उपस्थित पत्रकारांना दिला.
यावेळी,कृषी उत्पन्न बाजार समितीचे निर्वाचित संचालक शंभूदेव मुंडे, कविता सावंत,काँग्रेस आय कमिटीचे शहराध्यक्ष इनुस शेख, प्रभारी हनुमंत मुंडे,इकबाल चाऊस, इंतेसार सिद्दीकी, मेजर सुग्रीव सावंत, सय्यद जमीर भाई,शेख अझहर,लक्ष्मण लटपटे,प्राध्यापक सुरनर, प्राध्यापक विष्णू वासुरे,राजेशजी कांबळे, रमेश कातकडे, बाळासाहेब जंगले, गुणवंत कांबळे, बाळासाहेब कदम, चांद तांबोळी,आली चाऊस, आकाश मुंडे, तुषार उपाध्ये,प्रल्हाद ठवरे, संदीप ठवरे, भागवत जलाले, महेमूद शेख,शाम ठाकूर,पिराजी कांबळे, विकास रोडे, अशोक वावळे, सय्यद सद्दाम, शाम पंडीत,इम्रान पठाण, इब्राहिम खान, शेख गौस, वसीम खान, अलीम शेख, यांच्या मतीन खान, रोहिदास लांडगे, अविनाश जगतकर, तलसाराम चौधरी, यांच्यासह अनेक पत्रकार, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.




