इसलामपूर दि (प्रतिनिधी)
इकबाल पीरज़ादे
सहकार क्षेत्रात महिला महत्त्वाची भूमिका बजावत असून सध्या स्थिती बचत गटाच्या माध्यमातून विविध क्षेत्रात महिलांनी आपल्या कर्तुत्वाचा आदर्शवत ठसा उमटवला असल्याचे मत वारणा सहकारी बँकेचे अध्यक्ष निपून रावजी कोरे यांनी व्यक्त केले
ऐतवडे खुर्द येथील तात्यासाहेब कोरे सहकारी वारणा साखर कारखान्याचे व सांगली जिल्हा सहकारी बँकेचे माजी चेअरमन सहकार तज्ञ स्वर्गीय बाजीराव पाटील यांच्या 26 व्या जयंतीनिमित्त वारणा महाविद्यालय व बुद्धी विकास वाचनालय यांच्या संयुक्त विद्यमाने ऐतवडे खुर्द येथील शंभराच्या वरती आदर्शवत चालवणाऱ्या महिला बचत गटांना प्रोत्साहन देण्यासाठी विविध पुरस्काराने सन्मानित निपून कोरे यांच्या हस्तेकरण्यात आले त्यावेळी कोरे उपस्थित महिलांना मार्गदर्शन करताना बोलत होते
ऐतवडे खुर्द येथील शंभराच्या वरती विविध माध्यमातून बचत गट कार्यरत आहेत या बचत गटांना अधिकची चालना मिळावी यासाठी राजमाता जिजाऊ बहिणाबाई अहिल्याबाई होळकर सावित्रीबाई फुले ताराराणी लक्ष्मीबाई भाऊराव पाटील संत मुक्ताबाई संत जनाबाई हिरकणी असे विविध जीवन गौरव पुरस्कार देऊन बचत गटातील महिलांना सन्मानित करण्यात आले
यावेळी संजय गांधी निराधार योजनेचे माजी अध्यक्ष संजय पाटील म्हणाले सहकार क्षेत्रात महिलांना स्थान देण्यात आल्यामुळे या क्षेत्रात महिलांनी उत्कृष्ट कामगिरी केली असून बचत गटाच्या माध्यमातून सर्वसामान्य कुटुंबाचे अडचणी सोडवण्याचे काम करण्यात आले आजच्या युगात पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून महिला काम करीत असल्याने ही बाब अभिमानाचीच आहे महिलांचे जीवन संघर्ष मय असून संसाराची जबाबदारी चिकाटीने पार पडत असतात
विविध मान्यवरांच्या हस्ते भैरवनाथ बचत स्वयंसहाय्यता सही महिला राम रहीम किस्मत जय जय रघुवीर समर्थ दिव्यांग तुळजाभवानी विश्वकर्मा मोरेश्वर चैतन्य अशा विविध बचत गटातील महिलांना सन्मानित करण्यात आले हा गट आदर्श पणे चालवण्यासाठी पंचायत समितीच्या सीआरपी शारदा पाटील यांनी मौलाचे मार्गदर्शन केले यावेळी बुद्धी विकास वाचनालयाचे अध्यक्ष बी बी पाटील लोकनियुक्त सरपंच संजय पाटील तात्यासाहेब कोरे वारणा साखर कारखान्याचे संचालक श्रीनिवास डोईजड पश्चिम महाराष्ट्र प्रादेशिक सहकारी मंडळाचे अध्यक्ष डॉ प्रताप पाटील राजारामबापू वाचनालयाचे अध्यक्ष सचिन पाटील सांगली जिल्हा महिला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष सौ सुष्मिता जाधव उपाध्यक्ष अलका माने डॉ प्रज्ञा पाटील असे विविध मान्यवर उपस्थित होते प्रास्ताविक व स्वागत प्राध्यापक डॉ सुरज चौगुले यांनी केले तर शेवटी आभार प्राध्यापक अमित पाटील यांनी मांडली




