Home महाराष्ट्र अड्याळ येथे पद्मश्री पोपटराव पवार यांचे हस्ते सभागृह बांधकामाचे भुमीपुजन संपन्न

अड्याळ येथे पद्मश्री पोपटराव पवार यांचे हस्ते सभागृह बांधकामाचे भुमीपुजन संपन्न

415

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

ब्रम्हपुरी (दि.26 मार्च):-आदर्श गाव योजनेत बिगर गाभा उपक्रमांतर्गत 25 लक्ष रुपयाचे सार्वजनिक सभागृह बांधकामाचे भुमी पुजन महाराष्ट्र शासनाच्या आदर्श गाव योजनेचे कार्याध्यक्ष मा. पद्मश्री पोपटराव पवार साहेब यान्चे हस्ते नुकतेच पार पडले. गावात सार्वजनिक कार्यासाठी सभागृह नाहि त्यामुळे ती सोयआता उपलब्ध झालेली आहे त्यामुळे गावात आनंदाचे वातावरण आहे.

सविस्तर असे कि, अक्षयसेवा संस्था मेंडकी ही संस्था आदर्शगाव योजनेत कार्यान्वयन यंत्रणा म्हणुन कार्य करीत आहे अड्याळ हे गाव सदर योजनेत मागील पाच वर्षापासुन सहभागी आहे.योजनेतून प्रवेश प्रेरक उपक्रमांतर्गत वाचनालय भवन तयार करण्यात आले आहे

त्यामुळे विद्यार्थ्यांना अभ्यास करण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था झालि आहे.तसेच 330 हेक्टर शेतजमिनीचे मजगि पुनर्जीवन काम करण्यात आले आहे, तर उपजीविका उपक्रमांतर्गत गावातील 31 बचतगट व भुमीहिन लोकांना व्यवसाय करिता बिनव्याजी नव लक्ष रुपयाचे फिरते भांडवल वितरित करण्यात आले आहे. शेतकऱ्यांना अवजारे खरेदी, व उत्पादन वाढीसाठी सोई सुविधा करिता साहित्य खरेदीसाठि 15 लक्ष रुपये वितरित करण्यात येणार आहे. या योजनेतून व लोकसहभागातून विविध सामाजिक उपक्रम, प्रशिक्षण, अभ्यास सहल, असे विविध उपक्रम राबवण्यात आले आहेत.गावात महिलांचे संघटन तयार झाले आहे.

भुमीपुजन कार्यक्रमासाठी जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी भाऊसाहेब बऱ्हाटे, सरपंच ताराबाई गाडेकर, उपसरपंच नामदेवराव लांजेवार, तालुका कृषी अधिकारी पि. डि. खंडाळे, अक्षयसेवा संस्थेचे संचालक सुधाकर महाडोरे, ग्रामपंचायत सदस्य गिरीधर अलबनकर, रविभाउ उरकूडे, आदि मान्यवर उपस्थित होते.आदर्श गाव योजनेची गावात प्राभावी अमलबजावणी करिता ग्रामकार्यकर्ती निर्गुणाताई मोहुर्ले, जगदीश शेंडे, सुषमा मोहुर्ले, अधिक परिश्रम घेत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here