मा.जाॅन्शन मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या कडून सन्मान
रोशन मदनकर(उप संपादक)
चंद्रपूर(25 मार्च):- अधीसेविका वंदना विनोद बरडे उपजिल्हा रुग्णालय वरोरा जिल्हा चंद्रपूर यांचा मा.जाॅन्शन मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या कडून फ्लाॅरेंन्स नाईटिंगेल अवार्ड ने सन्मानित करण्यात आले. दिनांक 24 मार्च 2023 ला मा.कन्नमवार सभागृह चंद्रपूर येथे सौ वंदना विनोद बरडे अधीसेविका उपजिल्हा रुग्णालय वरोरा यांना जिल्हा स्तरावरील प्रथम पुरस्कार फ्लाॅरेंन्स नाईटिंगेल अवार्ड मा.जिल्हाधीकारी ,मा.जिल्हा आरोग्य आरोग्य अधिकारी, मा.जिल्हाशल्य चिकित्सक , डॉ कन्नाके निवासी वैद्यकीय अधीकारी मा.अधिसेविका यांच्या कडून प्रथम जिल्हास्तरीय फ्लाॅरेंन्स नाईटिंगेल पूरस्कार प्रदान करण्यात आला.
सोबत उपजिल्हा रुग्णालय वरोरा यांना राष्ट्रीय कूटुंब कल्याण कार्यक्रम जिल्ह्यातून 3 क्रमांक डॉ अंकुश राठोड वैद्यकीय अधीक्षक , तर कूटुंब नियोजन शस्त्रक्रिया डॉ लांबट यांना प्रमाणपत्र व मोमैंन्टो ने सन्मानीत करण्यात आले.तसेच रूबिना खान यांना फ्लॉरेन्स नाईटिंगेल अवार्ड व तांबी नियंत्रन कार्यक्रम यासाठी प्रमाणपत्र व मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. अधीसेविका वंदना विनोद बरडे यांना मोमेंन्टो व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले .
