बाळासाहेब ढोले(पुसद प्रतिनिधी)
पुसद(दि.25मार्च):-आजपर्यंत येथील प्रस्थापित लोकांनी फक्त वंचित समुहांचा वापर करुन घेतला. त्याच वंचित शोषित घटकांना सत्तेच्या चौकटीत बसविण्यासाठी, प्रस्थापितांचे धाबे दनानुन टाकण्यासाठी, प्रस्थापित पक्षांना त्यांची जागा दाखवुन देण्यासाठी श्रद्धेय नेते, ऍड. बाळासाहेब आंबेडकर यांनी आजच्याच दिवशी वंचित बहुजन आघाडी या नवीन राजकीय पर्वाची सुरुवात केली. हि सुरुवात एक, दोन नव्हे तर तब्बल ४२लाख मतदान घेऊन झाली. आमची सुरुवात अशी आहे तर आमच्या शेवटाची तुम्ही स्वप्न देखील बघु शकणार नाहीत.
या देशाच्या राजकारणात एक दिवशी नक्की एका गरीब मराठ्याचं, एका गरीब ओबीसी बांधवाचं, एका गरीब मागासवर्गीयाच पोरं सत्तेची चाबी आपल्या हातात घेईल. आणि असंख्य वंचितांना न्याय देईल. बांधवानो, एक व्हा वंचित बहुजन आघाडी या आपल्या हक्काच्या घरात सहभागी व्हा..!कार्यक्रमाचा समारोप परिवर्तन बहुउद्देशीय महिला मंडळातर्फे बुद्ध वंदना घेऊन करण्यात आला.
वंचित बहुजन आघाडीच्या वर्धापन दिना निमित्त उपस्थित शहराध्यक्ष जयानंद उबाळे, मधुकर सोनवणे, निवृत्ती थोरात, अरुण राऊत, भास्कर बनसोडे, शंकर करमणकर , अर्जुन उघडे, राज उंटवाल सागर खापरकर, रोहन करमणकर, अजय जाधव, विद्याताई नरवाडे, दीपा हराळ, अर्चना शिंदे, सया हरणे, रमाबाई कांबळे, गुंफा वाठोरे, राधा गायकवाड, मथुरा भगत, बेबी थोरात,प्रयाग बाई थोरात, लक्ष्मी डोके, माधुरी पडोळे , छाया राठोड, ममता पवार,लीलाबाई खंदारे, सुनिता वाकळे, नंदा जाधव, इंदु वानखेडे,कमल बिहाडे, कमल नरवाडे, गंगासागर वाढवे, रेखा इंगोले इत्यादी पक्षाचे पदाधिकारी ,कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
