Home महाराष्ट्र मोर्शी वरूड तालुक्यातील रस्ते विकासकामांसाठी अर्थसंकल्पात ४४ कोटीं ५० लक्ष रुपयांचा निधी...

मोर्शी वरूड तालुक्यातील रस्ते विकासकामांसाठी अर्थसंकल्पात ४४ कोटीं ५० लक्ष रुपयांचा निधी मंजूर !

98

🔸वरूड मोर्शी तालुक्यातील पुलांची व रस्त्यांची होणार दुरुस्ती !

🔹आमदार देवेंद्र भुयार यांच्या प्रयत्नांना यश !

✒️मोर्शी(पुरोगामी न्यूज नेटवर्क)

मोर्शी(दि.10मार्च):- तालुक्यातील अनेक रस्त्यांची दुरवस्था झाली असून ते रस्ते दुरुस्त करण्यासाठी आमदार देवेंद्र भुयार सतत प्रयत्नशील असून त्यांनी वरूड मोर्शी तालुक्यातील शिकस्त पुल, रस्ते विकास व दुरुस्तीच्या कामासाठी महाराष्ट्र राज्य शासनाकडून विविध योजनांमधून निधी उपलब्ध करून घेतलेला आहे.

राज्यात रस्ते विकासाचा भरीव कार्यक्रम शासनाने हाती घेतला असून राज्य शासनाने वरूड मोर्शी तालुक्यामध्ये ४४ कोटी ५० लक्ष रुपयांचा निधी मंजूर करून त्याची तरतूद पुरवणी अर्थसंकल्पात केली असून लवकरच वरूड मोर्शी तालुक्यातील शिकस्त पुल, रस्त्यांची कामे पूर्ण होणार असल्याची माहिती आमदार देवेंद्र भुयार यांनी यावेळी दिली.
मोर्शी तालुक्यातील प्रमुख रस्त्यांसाठी तब्बल ४४ कोटी ५० लक्ष रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. यामुळे या रस्त्यांचा विकास होऊन मतदारसंघात दळणवळण आणखी सुलभ होण्यास मदत होणार आहे. संबंधित भागाचा विकास होण्यास हातभार लागणार आहे.

मोर्शी विधानसभा मतदार संघाचे आमदार देवेंद्र भुयार यांनी याबाबत सरकारकडे प्रस्ताव सादर करून पाठपुरावा केला होता. मोर्शी तालुक्यातील या रस्त्याची सुधारणा करण्यासाठी पुल व मोऱ्यांच्या बांधकामासाठी ४४ कोटी ५० लक्ष रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वरूड मोर्शी तालुक्यातील रस्ते विकासाकरिता निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल आमदार देवेंद्र भुयार यांनी शिंदे, फडणवीस सरकारचे आभार मानले.

मोर्शी वरूड तालुक्याकरिता अर्थसंकल्पात मंजूर झालेला निधी व तरतूद केलेली कामे —
१) मोर्शी पाळा सालबर्डी डोंगर यावली दापोरी रस्त्यावरील पुलाचे बांधकाम करणे ५ कोटी रुपये,
२) मोर्शी मनिमपूर तरोडा धानोरा रस्त्यावर पुलाचे बांधकाम करणे २ कोटी ५० लक्ष रुपये.
३) चींचरगव्हाण उदापूर चांदस वाठोडा सावंगी एकलविहीर कारवार रस्त्याची सुधारणा करणे ४ कोटी ५० लक्ष रुपये.
४) रजुराबाजार मोरचुंद पवणी देउतवाडा घोराड ढगा एकदरा पोरगव्हाण आमनेर रस्त्याची मोऱ्यासह सुधारण करणे ६ कोटी रुपये.
५) बेनोडा करजगाव सावंगी लोणी रस्त्याची मोऱ्यासह सुधारण करणे २ कोटी ८० लक्ष रुपये.
६) राजुरा वडाळा थडी पवनी रस्त्याची मोऱ्यासह सुधारण करणे ३ कोटी ५० लक्ष रुपये.
७) नागझीरी गोरेगाव करजगाव पेठ मागंरुळी अमडापुर रस्त्याची सुधारणा करणे ३ कोटी ५० लक्ष रुपये.
८) खडका जामगाव माणिकपूर पळसोना गव्हाणकुंड भेमडी झटामझिरी तिवसाघाट रस्त्याची सुधारणा करणे ३ कोटी ५० लक्ष रुपये.
९) सुरळी उदापूर घोराड आमनेर बाभुळखेड बेसखेड
रस्त्याची सुधारणा करणे ४ कोटी रुपये.
१०) राजुरा बाजार मोरचूंद पवनी देऊरवाडा घोराड ढगा एकदरा पोरगव्हाण अमानेर रस्त्याची मोऱ्यासह सुधारणा करणे ५ कोटी रुपये.
११) परतवाडा चांदुर बाजार मोर्शी सिंभोरा आष्टी रस्त्याची सुधारणा करणे ४ कोटी २० लक्ष रुपये . या सर्व कामांकरिता एकूण ४४ कोटी ५० लक्ष रुपयांचा निधी सन २०२३ – २४ च्या अर्थसंकल्पात अंतर्भूत करून ही कामे मंजूर करण्यात आली आहे .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here