किशोर राऊत(महागाव प्रतिनिधी)
महागाव(दि.9मार्च):-केंद्र सरकारने व राज्य सरकारने प्रधानमंत्री आवास योजना नगरपंचायत हद्दीत राबविलेली आहे सर्व नागरिकांना पक्की घर बांधून देण्याचा मानस राज्य व केंद्र सरकारने घेतलेला होता त्या अनुषंगाने महागाव नगरपंचायत मध्ये बांधकामाला सुरुवात करण्यात आली होती परंतु निधी उपलब्ध नसल्यामुळे या कामाला संतगती निर्माण झाली होती अनेकांचे निधी अभावी बांधकामे अपूर्ण राहिली व काही लाभार्थ्यांनी व्याजाने बाहेरून पैसे काढून आपले घरी पूर्ण केले पण केंद्र व राज्य शासनाकडून निधी उपलब्ध होत नसल्यने अनेकांचे संसार उघड्यावर आली महागाव नगरपंचायत चे माजी उपनगराध्यक्ष तथा काँग्रेसचे गट नेते शैलेश कोपरकर यांनी विधान परिषदेचे आमदार वजाहत मिर्झा यांच्याकडे व्यथा मांडली त्या अनुषंगाने थेट मुंबई येथे जाऊन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेण्यात आली व महागाव शहराची परिस्थिती पाहता प्रधानमंत्री आवास योजनेची निधीसाठी मागणी करण्यात आली त्याच अनुषंगाने तात्काळ निधी देण्याचे संबंधित यंत्रणेला मुख्यमंत्री यांनी सांगितले व केंद्र शासनाकडे सुद्धा फोन करून आदेशित केले. अशी माहिती विधान परिषदेचे आमदार डॉ वजाहत मिर्झा यांनी दिली आहे.
प्रधानमंत्री आवास योजनेच्या लाभार्थ्यांना या निधीमुळे मोठा दिलासा मिळालेला असून लवकरच लाभार्थ्यांच्या खात्यात सुद्धा ही रक्कम जमा होणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. महागाव नगरपंचायतच्या आतापर्यंतच्या कालखंडात प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत प्रथम डीपीआर मध्ये 275 दुसऱ्या डीपीआर मध्ये 401 व तिसरा मध्ये 179 लाभार्थ्यांची घरे मंजूर झालेली आहेत ही सर्व घरे मागील नगरपंचायतच्या काँग्रेसच्या काळात मंजूर झाली होती परंतु निधी अभावी सर्व कामे रखडलेली असल्यामुळे शैलेश कोपरकर यांनी पाठपुरावा केल्यामुळे महागाव नगरपंचायत मध्ये सात कोटी 80 लाख रुपये मंजूर झाल्याचे सुद्धा मिर्झा यांनी सांगितले आहे.
महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधान परिषदेचे आमदार डॉ वजाहत मिर्झा यांच्या समवेत महागाव नगरपंचायत चे काँग्रेसचे गटनेते शैलेश कोपरकर, महागाव तालुका जिनिंग प्रेसिंगचे अध्यक्ष तथा नगरसेवक संभाजीराव नरवाडे , गजानन पाटील हे उपस्थित होते यावेळी सकारात्मक चर्चा करून भविष्यातल्या कालखंडासाठी महागाव नगरपंचायत ला निधी कमी पडू देणार नाही असे सांगितले. महागाव नगरपंचायत कडून सुद्धा अनेक वेळा कागदपत्रे पाठपुरावा करण्यात आला होता या कामाकरिता महागाव नगरपंचायत चे प्रभारी मुख्याधिकारी किरण सुकलवाड, नगरपंचायत चे अभियंता अक्षय राऊत , प्रधानमंत्री आवास योजनेचे अभियंता आकाश चव्हाण, प्रधानमंत्री आवास योजनेचे एजन्सी धारक सोनकांबळे , लिपिक अमोल गाडबैले यांनी सुद्धा पाठपुरावा केला आहे




