प्रतिनिधी नागभीड(संजय बागडे)मो:-९६८९८६५९५४
नागभीड(दि.25फेब्रुवारी):- तालुक्यातील नांदेड येथील डोमाजी आधार फाउंडेशनचे संस्थापक,अध्यक्ष परमेश्वर डोमाजी मडावी यांच्या नेतृत्वात त्याच्या मित्रमंडळींनी कुठलाही नाच गाण्याचा धिंगाणा न करता मनोरुग्णांची सेवा करून शिवरायांची जयंती साजरी केली. हे कार्य तो मागील चार वर्षांपासून करीत असून यावर्षी त्याने 11 मनोरुग्ण,वेडे, भिकारी यांची सेवा सुसृषा केली आहे.
नागभीड,सिंदेवाही,चिमूर तालुक्यातून वाटेने इतरत्र भटकणाऱ्या मनोरुग्णांना शोधून काढले. त्यांच्याशी आस्थेने संवाद साधला. प्रेमाने त्यांना जवळ केले.व विश्वासात घेऊन पियुष देवगडे या मित्राच्या सहकार्याने त्यांची कटिंग दाढी करून दिली.त्यांचे साबणाने स्नान करून दिले,अंगावर नवीन कपडे परिधान करून दिले.व पोटभर अन्न खाऊ घातलं.शिवजयंती दिवशी छत्रपती शिवरायांना एक आदरांजली म्हणून हा उपक्रम मागील 4 वर्षांपासून सुरु आहे.
या वर्षी 11 मनोरुग्णांची सेवा करण्याची संधी प्राप्त झाली. पुढेही हा उपक्रम सुरूच राहणार असल्याचे मत परमेश्वर मडावी यांनी व्यक्त केले.या उपक्रमाला साकार करण्यासाठी ज्या सहृदयी मित्रांचा त्याला सहयोग लाभला. त्यामध्ये राहुल मडावी,संजय खोब्रागडे,पियुष देवगडे,अविनाश सहारे,अनुज रामटेके,अंकित रामटेके,सम्यक खोब्रागडे,यश रामटेके,उत्कर्ष इचकापे,लक्की कुमरे,जगदीश (जग्गू)मसराम, संबुध खोब्रागडे आदींचा सहभाग आहे.




