Home महाराष्ट्र धम्मक्रांती प्रज्ञापर्व समिती २०२३च्या अध्यक्षपदी किशोरदादा कांबळे यांची निवड

धम्मक्रांती प्रज्ञापर्व समिती २०२३च्या अध्यक्षपदी किशोरदादा कांबळे यांची निवड

141

✒️बाळासाहेब ढोले(पुसद प्रतिनिधी)

पुसद(दि.23फेब्रुवारी):-धम्मनायक सम्राट अशोक व महात्मा ज्योतिबा फुले आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती धम्मक्रांती प्रज्ञापर्व समिती पुसद २०२३च्या अध्यक्ष निवडीचा कार्यक्रम संभाजीनगर येथील बुध्दविहारात २२फेब्रुवारी २०२३रोजी पार पडला.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी धम्मक्रांती प्रज्ञापर्व समितीचे संस्थापक अध्यक्ष तथा ज्येष्ठ मार्गदर्शक भीमराव दादा कांबळे उपस्थित होते.प्रमुख अतिथी म्हणून २०२२ अध्यक्ष विठ्ठल खडसे,तर प्रमुख पाहुणे म्हणून राजेश ढोले, राजेंद्र नाईक, अशोक भालेराव ,नरेंद्र पाटील, संतोष अंभोरे, बुध्दरत्न भालेराव ,मिलिंद हट्टेकर,भोलानाथ कांबळे, देवेंद्र खडसे, राहुल कांबळे,शितलकुमार वानखेडे, किशोर मुजमुले,प्रा.दादाराव अगमे, प्रा. महेश हंबर्डे ,प्रा.सुनिल खाडे, बाबाराव उबाळे ,विष्णू सरकटे ,भारत कांबळे,मुन्ना हाटे, ऍड.वाय .एम जांभुळकर, लक्ष्मण कांबळे, साहेबराव गुजर, दिपक भवरे,प्रेम ढोके, प्रा.आंबादास वानखेडे,शरद ढेंबरे तसेच इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

उपस्थित मान्यवरांच्या हस्ते तथागत भगवान बुद्ध व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली.

मावळते अध्यक्ष विठ्ठल खडसे यांचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर पूर्णाकृती पुतळ्याचे सुशोभीकरण , सौंदर्यकरण करण्याच्या मागणीसाठी केलेल्या कार्याबद्दल समाजाच्या वतीने सत्कार करण्यात आला.तसेच मावळते अध्यक्ष विठ्ठल खडसे यांनी शिवजयंती दिनी छत्रपती शिवाजी महाराजांना समता सैनिक दलाच्या वतीने भव्यदिव्य मानवंदना आयोजनाच्या कार्यक्रमाबद्दल भारत कांबळे यांचा सत्कार केला. त्यानंतर नरेंद्र पाटील यांनी मागील वर्षाचा लेखाजोखा वाचून दाखविला, यावेळी भीमरावदादा कांबळे, लक्ष्मण कांबळे,मुन्ना हाटे, देवाभाऊ जगताप,पद्मा दिवेकर, सुरज हाडसे यांनी आपले मत मांडले.

धम्मक्रांती प्रज्ञापर्व समिती २०२३च्या अध्यक्षपदासाठी किशोर दादा कांबळे ,महेंद्र कांबळे ,स्वप्नील पाईकराव, देवाभाऊ जगताप, यांनी इच्छुकता दर्शविली यासाठी मतदान प्रक्रियेतून अध्यक्षपदाची निवड करण्यात आली. यामध्ये किशोरदादा कांबळे हे बहुमताने अध्यक्षपदी निवडून आले.

धम्मक्रांती प्रज्ञापर्व समिती २०२३ च्या अध्यक्षपदी भीम टायगर सेनेचे जिल्हाध्यक्ष किशोरदादा कांबळे यांची निवड झाल्याबद्दल अभिनंदनचा वर्षाव होत आहे. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार दीपक भवरे यांनी केले या कार्यक्रमास तरुण मंडळी, महिला तथा समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here