शिष्यवृत्ती परीक्षेत पात्र
नागभीड(पुरोगामी न्युज नेटवर्क)
नागभीड(दि.21फेब्रुवारी):-पंचायत समिती नागभीड च्या शिक्षण विभागाच्या वतीने गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळ्याचे आयोजन पंचायत समिती च्या सभागृहात आयोजित करण्यात आले होते..
या कार्यक्रमाला बक्षीस वितरक म्हणून शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालायचे प्राचार्य डॉ.डी. एन. शिंगाडे सर यांची उपस्थिती होती तर अध्यक्ष स्थानी संवर्ग विकास अधिकारी प्रणाली खोचरे मॅडम, प्रमुख अतिथी म्हणून सहायक गट विकास अधिकारी अशोक बुराडे ,तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.विनोद मडावी,गटशिक्षणाधिकारी अरविंद चिलबुले सर यांची उपस्थिती होती..
या सर्व मान्यवरांच्या हस्ते सरस्वती मंदिर मंदिर नागभीड येथील विद्यार्थिनी मितन विलास मेश्राम ही इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेसाठी पात्र झाल्याबद्दल तिचा प्रमाणपत्र,स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला… तिच्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष संजय गजपुरे,मुख्याध्यापक गोकुळ पानसे व शाळेतील सर्व शिक्षकांनी तिचे अभिनंदन केले…!!!!
————




