Home महाराष्ट्र जिल्हाधिकारी व शिक्षण विभागाच्या कापीमुक्त परिक्षा अभियानाला तलवाडा पोलिसांकडून केराची टोपली !

जिल्हाधिकारी व शिक्षण विभागाच्या कापीमुक्त परिक्षा अभियानाला तलवाडा पोलिसांकडून केराची टोपली !

100

✒️शेख आतिख(तलवाडा प्रतिनिधी)

तलवाडा(दि.21फेब्रुवारी):-महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या बारावीच्या परीक्षेला, मंगळवार दिनांक २१ रोजी सकाळी अकरा वाजता शांततेत सुरूवात झाल्याचे दिसून येत होते. दरम्यान बीड जिल्हाधिकारी श्रीमती मुधोळ-मुंडे यांच्या आदेशानुसार सर्व केन्द्रावर कॉपी मुक्त वातावरणात परीक्षा घेण्याचे आदेश देण्यात आले होते. बैठे पथक व पोलीस प्रशासनाच्या देखरेखीत सर्व केन्द्रावर लक्ष ठेवण्यासाठी पोलीस बंदोबस्त ही दिल्याचे चित्र पाहायला मिळत होते.

परंतु गेवराई तालुक्यातील तलवाडा येथील दोन्ही परिक्षा केंद्रावर पोलीस बंदोबस्त फक्त नावालाच दिसुन आला. पोलीस व बैठे पथक तलवाडा परिक्षा केंद्रावर असुन देखील सर्रासपणे पहिल्याच दिवशी काप्यांचा सुळसुळाट दिसुन आला असून नुसता दिसुनच आला नाही तर सदरील प्रकार आमच्या प्रतीनिधी कडुन कॅमे-यात देखील टिपन्यात आला.इंग्रजी विषयाचा पहिला पेपर मंगळवारी सकाळी अकरा वाजता सुरू होऊन दोन वाजता संपला. पण या दरम्यान जिल्हाधिकारी व शिक्षण विभागाने कापीमुक्त परिक्षेचे दिलेले आदेश तलवाडा पोलिसांनी केराच्या टोपलीत टाकले की काय कामे-यात टिपलेल्या घटणे वरुन दिसुन आले.

परिक्षा केंद्रावर नियमानुसार प्रतेक विद्यार्थ्यांना तपासून हॉल मध्ये सोडण्यात आले. होते. तरी पण पेपर सुर झाल्या नंतर कापी बहाद्दरांची धावपळ व पोलीस प्रशासनाच्या कर्मचा-यांचा मिळमिळपणा तलवाडा परिक्षा केंद्रावर दिसुन आल्याने जिल्हाधिकारी व शिक्षण विभागाला तलवाडा पोलिस प्रशासन जुमानत नसल्याचा प्रकार या ठिकाणी दिसुन आला आहे. या पहिल्या दिवशी परिक्षा केंद्रावर जिल्हाधिका-यांच्या आदेशाची पायमल्ली कर्णा-या पोलीस कर्मचा-यांची जिल्हाधिकारी मॅडम दखल घेतील का?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here